News Flash

झोपडपट्टीवासीयांना मोफत घरं, या बाळासाहेबांच्या घोषणेनंतर मराठीची घसरण सुरू : राज ठाकरे

१९९५ पूर्वीचा आणि १९९५ नंतरच्या महाराष्ट्रात खुप मोठा फरक पडला, असंही ते म्हणाले.

“शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी झोपडपट्टीवासीयांना मोफत घरं देण्याची घोषणा केली. त्यांचा त्या मागचा उद्देश चांगला होता. पण मराठीच्या घसरणीला ही घोषणा कारणीभूत ठरली,” असं मत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी व्यक्त केलं. एका मराठी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते.

“१९९५ पूर्वीची परिस्थिती आणि १९९५ नंतरची परिस्थिती पाहिलं तर आपल्याला सर्व लक्षात येईल. १९९५ पूर्वीचा आणि १९९५ नंतरच्या महाराष्ट्रात खुप मोठा फरक पडला. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी झोपडपट्टीवासीयांना मोफत घरं देण्याची घोषणा केली. अनेक ठिकाणी मराठी लोकं झोपडपट्ट्यांमध्ये राहत होती. या लोकांना चांगली घरं मिळावी हा उद्देश होता. बाळासाहेबांचा यामागचा उद्देश चांगला होता. पण मराठीच्या घसरणीला ही घोषणा कारणीभूत ठरली,” असं राज ठाकरे यावेळी म्हणाले.

आणखी वाचा- लॉकडाउनच्या काळात महाराष्ट्र सोडून जाणाऱ्या परप्रांतीयांना राज यांनी खडसावले, म्हणाले…

“मुंबईमध्ये महाराष्ट्रात फुकट घरं मिळतायत हे ऐकून अनेकांनी आपला मोर्चा या ठिकाणी वळवला. त्यानंतरचा महाराष्ट्रातील परप्रांतीयांचा आकडा पाहा. १९९५ पूर्वी परप्रातीयांचा आकडा किती होता आणि १९९५ नंतर परप्रांतीयांचा आकडा किती झाला हे पाहिलं पाहिजे. त्यानंतर खऱ्या अर्थानं महाराष्ट्र घसरत आला,” असं ते म्हणाले. “झोपडपट्टी पुनर्विकासाचं काम मी बिल्डरांना देऊ नका असं सांगितलं होतं,” याचा उल्लेखही त्यांनी यावेळी केला.

“आज मुंबई पुणे दृतगती महामार्ग झाला. त्यानंतर पुण्याची काय अवस्था झाली हे पाहा. तसं म्हटलं तर अनेक शहरांची अवस्था आज बकालच झाली आहे. पण पुणे हे टुमदार शहर होतं. आता त्याला काही आकारचं उरला नाही. ते शहर आक्राळविक्राळ झालं आहे,” असं राज ठाकरे यावेळी म्हणाले.

आणखी वाचा- राज ठाकरेंच्या मते महाराष्ट्रासमोर ‘हे’ आहे सर्वात मोठं आव्हान

महाराष्ट्राचाच विचार करण्याची गरज

“महाराष्ट्राचे जे कोणी नेते झाले त्यांनी आजपर्यंतर देशाचा विचार केला. अन्य राज्यांच्या नेत्यांनी त्यांच्या त्यांच्या राज्यांचा विचार केला. आपण देशाचा विचार केला ही चुक झाली का अस वाटतंय. त्यामुळे आता महाराष्ट्रानं महाराष्ट्राचा विचार केला पाहिजे,” असंही ते म्हणाले.

महाराष्ट्र स्वत:ची ताकद घालवतोय

“महाराष्ट्राची जी ताकद होती ती महाराष्ट्र स्वत:हून घालवतो आहे. आज आपण नुसतो म्हणतो अनेकांनी अटकेपार झेंडा रोवला आहे. आज अनेकांन अटकेपार झेडा रोवला हे काय आहे हेदेखील माहित नसेल. आताच्या पाकिस्तानात असलेल्या अटकेपर्यंत धडक मारून पेशव्यांनी मराठी साम्राज्याचा भगवा झेंडा तिथे रोवला होता. हा इतिहास कोणाला माहित नसेल. आज अटक हा शब्द जरी ऐकला तरी काही लोकांच्या डोळ्यासमोर आर्थर रोड जेलचं येत असेल,” असंही राज म्हणाले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 1, 2020 6:08 pm

Web Title: mns chief raj thackeray shiv sena chief balasaheb thackeray houses for people staying in slum marathi percentage jud 87
Next Stories
1 लॉकडाउनच्या काळात महाराष्ट्र सोडून जाणाऱ्या परप्रांतीयांना राज यांनी खडसावले, म्हणाले…
2 राज ठाकरेंच्या मते महाराष्ट्रासमोर ‘हे’ आहे सर्वात मोठं आव्हान
3 “लॉकडाउनआधी महाराष्ट्रात काय दारुबंदी होती का?”, शिवसेनेच्या टीकेला राज ठाकरेंचं प्रत्युत्तर
Just Now!
X