25 February 2021

News Flash

‘सम्राट’ कायमचा ‘बंद’ झाला ; राज ठाकरेंची जॉर्ज फर्नांडिस यांना श्रद्धांजली

'सम्राट' कायमचा 'बंद' झाला, असे राज ठाकरे यांनी म्हटले आहे.

राज ठाकरे यांनी मंगळवारी ट्विटरवर व्यंगचित्र शेअर करत जॉर्ज फर्नांडिस यांना श्रद्धांजली अर्पण केली. 

कामगार नेते आणि माजी संरक्षण मंत्री जॉर्ज फर्नांडिस यांना मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी व्यंगचित्रातून श्रद्धांजली अर्पण केली आहे. ‘सम्राट’ कायमचा ‘बंद’ झाला, असे राज ठाकरे यांनी व्यंगचित्रातून म्हटले आहे.

जॉर्ज फर्नांडिस यांचे मंगळवारी सकाळी दिल्लीतील रुग्णालयात निधन झाले. ते ८८ वर्षांचे होते. फर्नांडिस यांच्या निधनावर पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आदी नेत्यांनी शोक व्यक्त केला आहे. राज ठाकरे यांनी देखील मंगळवारी दुपारी ट्विटरवर व्यंगचित्र शेअर करत जॉर्ज फर्नांडिस यांना श्रद्धांजली अर्पण केली. ‘सम्राट’ कायमचा ‘बंद’ झाला, असे राज ठाकरे यांनी व्यंगचित्रातून म्हटले आहे.

फर्नांडिस आणि मुंबई बंद
फर्नांडिस म्हणजे बंद हे जणू समीकरणच झाले होते. अनेक कामगार संघटांनाचे नेतृत्व करताना फर्नांडिस यांनी कामागारांच्या मागण्यांसाठी बंदचे शस्त्र वापरले. त्यांची ओळख ‘जॉर्ज फर्नांडिस: बंदसम्राट’ अशी तयार झाली. त्यांच्या नेतृत्वाखाली १९७० च्या दशकामध्ये अनेकदा मुंबईमधील संघटित कामगारांनी बंदची हाक दिली आणि ती यशस्वी करुन दाखवली. फर्नांडिस यांनी वाहतूक संघटनांना त्याच्या मागण्यांसाठी बंद हा प्रभावी पर्याय असल्याची जाणीव करुन दिली. त्याच्या या बंदच्या हाकेला नंतर बेस्ट संघटना, रेल्वे तसेच टॅक्सी युनियन्सही आपलेसे केले. त्यामुळे जर सार्वजनिक प्रवासाची माध्यमेच बंदमध्ये सहभागी झाली तर तो बंद यशस्वी होतोच. जवळजवळ दोन दशके फर्नांडिस यांनी अशाप्रकारे बंदच्या माध्यमातून कामगारांचे प्रश्न सामान्य मुंबईकरांपर्यंत आणि सरकारपर्यंत पोहोचवले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 29, 2019 1:19 pm

Web Title: mns chief raj thackeray tribute to george fernandes in cartoon
Next Stories
1 जॉर्ज फर्नांडिस: कोकण रेल्वेचा खरा निर्माता
2 मॉर्निंग बुलेटिन : पाच महत्त्वाच्या बातम्या
3 ‘अनुदान बळीराजाच्या पदरात पाडा, अन्यथा शेतकरी काय करेल याचा ‘दाखला’ गडकरींनी दिला आहे’
Just Now!
X