22 April 2019

News Flash

अमितच्या लग्नाइतकाच ५०० आदिवासी तरुण-तरुणींच्या लग्नाने आनंद – राज ठाकरे

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे पालघर जिल्ह्यात बोईसर येथे शनिवारी सामुदायिक विवाह सोहळयाचे आयोजन करण्यात आले होते. ५०० आदिवासी जोडप्यांचे यावेळी लग्न लावण्यात आले.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे पालघर जिल्ह्यात बोईसर येथे शनिवारी सामुदायिक विवाह सोहळयाचे आयोजन करण्यात आले होते. ५०० आदिवासी जोडप्यांचे यावेळी लग्न लावण्यात आले. स्वत: मनसे अध्यक्ष राज ठाकरे पत्नी शर्मिला ठाकरे यांच्यासह या विवाहसोहळयाला उपस्थित होते.

राज ठाकरेंनी या लग्नसोहळयाला उपस्थित रहात वधू-वरांच्या डोक्यावर अक्षता टाकल्या तसेच त्यांना भावी जीवनासाठी आशिर्वादही दिले. या कार्यक्रमानंतर राज ठाकरे यांनी टि्वट करुन आपला आनंद व्यक्त केला. नुकतंच माझा मुलगा अमितचं लग्न झालं, ह्या सोहळ्या इतकंच समाधान आणि आनंद आज अजून एका सोहळ्याने दिला असे राज यांनी म्हटले आहे.

राज यांचा मुलगा अमित ठाकरे यांच २७ जानेवारीला लग्न झालं. फॅशन डिझायनर मिताली बोरुडेबरोबर अमित विवाहबंधनात अडकला. या लग्नसोहळयाला राजकारण, उद्योग आणि चित्रपट सृष्टीतील दिग्गजांनी उपस्थिती लावली.

First Published on February 9, 2019 5:31 pm

Web Title: mns chief raj thackray present to adivasi wedding