News Flash

राज ठाकरेंनी रो-रो बोट प्रवासात दंड भरल्याचं वृत्त चुकीचं, मनसेचं स्पष्टीकरण

मनसेने पत्रक काढून दिलं स्पष्टीकरण

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सार्वजनिक ठिकाणी पाळायचा नियम मोडल्याने त्यांना दंड भरावा लागल्याचं वृत्त पूर्णपणे चुकीचं आणि खोडसाळपणे दिल्याचं मनसेनं म्हटलं आहे. मनसेचे नेते नितीन सरदेसाई यांनी मनसे अधिकृत या पक्षाच्या ट्विटर हँडलवर एक पत्रक काढून असं काहीही घडलं नसल्याचं स्पष्ट केलं आहे.

काय म्हटलं आहे मनसेच्या पत्रात?
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या अलिबाग दौऱ्या दरम्यान चुकीची आणि खोडसाळ बातमी देण्यात आली. एका वृत्तवाहिनीच्या फेसबुक पेजवर एका इंग्रजी दैनिकाचा हवाला देऊन प्रसारित करण्यात आली. ज्यात असे म्हटलं होतं की ‘मनसे अध्यक्ष राज ठाकरे शुक्रवारी मुंबईहून अलिबागला गेले. त्यावेळी त्यांनी रो-रो फेरीने प्रवास केला. राज ठाकरे बोटीवरच्या मोकळ्या जागेत मास्क न घालता उभे होते तसंच यावेळी त्यांनी सिगारेटही ओढली. या सगळ्या प्रकारानंतर बोटीवरच्या अधिकाऱ्यांनी राज ठाकरेंना दंड ठोठावला. मात्र सदर प्रवासात मी राज ठाकरेंसोबत होतो. अशी कोणतीही घटना घडलेली नाही असे मी ठामपणे सांगतो आहे. प्रसारित करण्यात आलेली बातमी पूर्ण चुकीची आणि खोडसाळ आहे. अशा बातम्यांमुळे लोकांची दिशाभूल होते.

काय होती बातमी?

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शुक्रवारी मुंबई ते मांडवा असा प्रवास रो-रो बोटीने केला. या दरम्यान ते मोकळ्या जागेत मास्क न लावता उभे होते, तसंच त्यांनी सिगारेटही शिलगावली असं वृत्त ‘मुंबई मिररने’ दिलं होतं.

मात्र या संपूर्ण प्रकरणावर मनसेने एक पत्रक काढून ते पक्षाच्या अधिकृत ट्विटर हँडलवर ट्विट केलं आहे. असा कोणताही प्रकार घडला नाही असं नितीन सरदेसाई यांनी या पत्रकात म्हटलं आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 21, 2020 6:29 pm

Web Title: mns clarifies on raj thackeray fine 1 thousand for not wearing mask on ro ro boat scj 81
Next Stories
1 “आई जेवू घालेना आणि बाप भीक मागू देईना अशी ठाकरे सरकारला वागणूक,” अमोल कोल्हेंचा मोदी सरकारवर हल्लाबोल
2 Coronavirus : राज्यात २४ तासांत पाच पोलिसांचा मृत्यू, आणखी १५९ करोनाबाधित
3 “शेतकऱ्यांची पोरं हातात दगड घेतील आणि…,” राजू शेट्टींनी संतापून दिला इशारा
Just Now!
X