07 March 2021

News Flash

दापोली नगरपंचायत विकास शुल्काचे कथित अपहार प्रकरण चिघळले

दापोली नगरपंचायतीच्या विकास शुल्काचे कथित अपहार प्रकरण चिघळत चालले

मुख्याधिकाऱ्यांना नगरसेवकांची धमकी
दापोली नगरपंचायतीच्या विकास शुल्काचे कथित अपहार प्रकरण चिघळत चालले असून याप्रकरणी मनसेच्या नगरसेवकांनी धमकी दिल्याची तक्रार खुद्द मुख्याधिकारी संजीवनी दळवी यांनी पोलीस ठाण्यात दिली आहे.
नगरपंचायत अभियंता सुनील सावके याने २०१४ मध्ये विकसक रवींद्र क्षीरसागर यांच्याकडून शहरातील एका जागेच्या विकास शुल्कापोटी २७ लाख रुपये घेतले होते. या वेळी दिलेल्या पावतीबाबत शंका आल्याने माहितीच्या अधिकारात क्षीरसागर यांनी नगरपंचायतीकडे अर्ज केला. त्या वेळी नगरपंचायतीच्या खात्यात ही रक्कम जमा झाली नसल्याचे त्यांना कळवण्यात आले.
त्यामुळे क्षीरसागर यांनी बांधकाम अभियंता सुनील सावके यांच्याविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. पोलिसांनी सावके याला चौकशीसाठी ताब्यात घेतल्यानंतर सावके यांची प्रकृती अचानक बिघडली. त्याला प्रथम दापोली उपजिल्हा रुग्णालयात आणि त्यानंतर रत्नागिरी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यामुळे गेल्या पाच दिवसांपासून पोलिसांनाही याप्रकरणी अधिक चौकशी करता आलेली नाही.
दरम्यान, मनसे नगरसेवक नितीन िशदे, सचिन गायकवाड, प्रकाश साळवी आणि मनसे तालुकाध्यक्ष संदीप केळकर मुख्याधिकाऱ्यांना याप्रकरणी जाब विचारण्यासाठी गेले होते.
त्या वेळी सावके याने पसे घेताना तुम्ही कोठे होता, त्याच्यावरच फक्त गुन्हा का दाखल झाला आहे, असे विचारत मनसे पदाधिकाऱ्यांनी आपल्याला धमकी दिल्याची तक्रार मुख्याधिकारी संजीवनी दळवी यांनी दापोली पोलीस ठाण्यात केली आहे. दरम्यान, विकासकांनी पावत्या दाखवून विकास शुल्काच्या रकमा नगरपंचायतीच्या खात्यात भरल्या आहेत काय, याची खातरजमा करावी. त्यातून या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात येण्यास मदत होईल, असे आवाहन पोलीस यंत्रणेकडून देण्यात आले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 9, 2016 12:04 am

Web Title: mns comment on dapoli nagar panchayat development charges case
टॅग : Mns
Next Stories
1 महाडच्या तेरा शाळांचा शंभर टक्के निकाल
2 कराडला कन्यागत पर्वकाळ सोहळा
3 आता दर महिन्याच्या २१ तारखेला राज्यात योग दिन
Just Now!
X