22 September 2020

News Flash

….मूँह काला कर चुके है ! मनसेच्या अमेय खोपकरांचा संजय राऊतांना टोला

संजय राऊत विरोधकांच्या निशाण्यावर

कंगना रणौत प्रकरणावरुन सध्या प्रसारमाध्यमांमध्ये चर्चेत असलेले शिवसेनेचे राज्यसभा खासदार संजय राऊत आता विरोधकांच्या निशाण्यावर आले आहेत. कंगनावर टीका करताना हरामखोर मुलगी असा शब्दप्रयोग केल्याने राऊतांवर टीकेची झोड उठवण्यात येत आहे. विरोधकांसह अनेक सेलिब्रेटींनीही यावर नाराजी व्यक्त करत राऊतांनी माफी मागायला हवी अशी मागणी केली. याप्रकरणी संजय राऊतांनी सकाळी एक सूचक ट्विट करत विरोधकांना इशारा दिला.

राऊतांच्या या ट्विटला उत्तर देताना मनसे चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांनी…राऊतांना मार्मिक टोला लगावला आहे.

कंगना रणौतने मुंबईची तुलना पाकव्याप्त काश्मीरशी केल्यामुळे गेल्या काही दिवसांपासून राज्यातलं वातावरण चांगलंच तापलं आहे. शिवसेनेने कंगानला आपल्या टीकेचं लक्ष्य करत मुंबई ही मराठी माणसाच्या बापाचीच असल्याचं सांगितलं होतं. तसेच मुंबईत अनेक ठिकाणी शिवसेना महिला कार्यकर्त्यांनी कंगनाच्या पुतळ्यांना चपलांनी चोप देत आपला निषेध व्यक्त केला. भाजपानेही याप्रकरणी सावध भूमिका घेतली आहे. सुशांत सिंह प्रकरणातील चौकशीवरुन लक्ष हटवण्यासाठी हा प्रकार केला जात असल्याची टीका भाजपाने केली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 6, 2020 4:55 pm

Web Title: mns leader ameya khopkar criticize shiv sena mp sanjay raut psd 91
Next Stories
1 करोनाशी एकजूट होऊन लढूया, चंद्रकांत पाटलांचे मुख्यमंत्र्यांना पत्र
2 छत्रपती संभाजी महाराजांच्या नावाचा वापर तातडीनं थांबवा; रोहित पवारांची कंपनीकडे मागणी
3 राज्यात २४ तासांत ५०० पेक्षा जास्त पोलीस करोनाबाधित, सात जणांचा मृत्यू
Just Now!
X