२००९ मध्ये नाशिक येथील औद्योगिक कारखान्यांमध्ये परप्रांतीयांऐवजी मराठी उमेदवारांनाच नोकरी देण्याचे फर्मान काढल्याप्रकरणी गुन्हा दाखल झालेले मनसेचे प्रदेश सरचिटणीस अतुल चांडक यांना तब्बल पाच वर्षांनंतर बुधवारी रात्री पोलिसांनी अटक केली.रात्री ९ च्या सुमारास सातपूर पोलिसांनी चांडक यांना ताब्यात घेतले. २००९ मध्ये मनसेने परप्रांतीयांविरोधात मोठय़ा प्रमाणावर आंदोलन सुरू केले होते. नाशिक येथील अंबड व सातपूर येथील औद्योगिक कारखान्यांमध्ये परप्रांतीयांऐवजी स्थानिक मराठी उमेदवारांनाच संधी देण्यात यावी, असे पत्रक मनसे नेत्यांनी उद्योजकांना दिले होते.त्याप्रकरणी चांडक यांच्यासह मनसेच्या  नेत्यांविरुद्ध गुन्हा दाखल झाला होता.