20 January 2021

News Flash

‘पुनःश्च हरि ओम म्हणता आणि हरिलाच कोंडून ठेवता?’ मनसेचा ठाकरे सरकारला प्रश्न

करोना फक्त मंदिरातच होतो का? असाही प्रश्न मनसेने विचारला आहे

मंदिरांच्या मुद्द्यावरुन मनसे पुन्हा एकदा आक्रमक झाली आहे. मनसेने मंदिरं कधी उघडणार यावरुन ठाकरे सरकारला पुन्हा एकदा प्रश्न विचारला आहे. पुनश्च हरि ओम असं म्हणता आणि हरिलाच कोंडून ठेवता? मनसेचे नेते आणि माजी आमदार बाळा नांदगावकर यांनी ठाकरे सरकारला हा प्रश्न विचारला आहे. बाळा नांदगावकर यांनी ट्विट करुन ठाकरे सरकारवर टीका केली आहे. राज्यात बार उघडले गेले, बारची वेळही ठरवून देण्यात आली. त्यानंतर जलतरण तलाव आणि मल्टिप्लेक्स यांनाही संमती देण्यात आली. करोना फक्त मंदिरातच होतो का? हा फक्त भावनेचा प्रश्न नाही तर मंदिरांवर अवलंबून असलेल्या व्यावसायिकांच्या रोजी-रोटीचाही प्रश्न आहे असंही बाळा नांदगावकर यांनी म्हटलं आहे.

आणखी वाचा- “इतर लोक सरकारशी चर्चा करतात, तुम्हाला…”; राष्ट्रवादीचा भाजपाला टोला

मनसे बाळा नांदगावकर यांनी ट्विट करुन ठाकरे सरकारवर मंदिरं उघडण्याच्या मुद्द्यावरुन टीका केली आहे. बारची वेळ ठरवून दिली गेली आहे, जलतरण तलाव खुले केले आहेत. मल्टिप्लेक्सलाही संमती देण्यात आली आहे. मग करोना फक्त मंदिरात असतो का? या मागे या सरकारचा काय तर्क असावा हे एक कोडंच आहे असंही बाळा नांदगावकर यांनी म्हटलं आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 6, 2020 2:03 pm

Web Title: mns leader bala nandgaokr slams thackeray govrnment on temple opening issue scj 81
Next Stories
1 पुढच्या सात पिढ्या आशिर्वाद देतील; आदित्य ठाकरेंकडे काँग्रेसनं केली मागणी
2 महाराष्ट्रातील शाळा सुरु करण्यासंबंधी मोठी घडामोड, शिक्षणमंत्र्यांनी दिली माहिती
3 दिवाळीसाठी ठाकरे सरकारनं जारी केली नियमावली
Just Now!
X