News Flash

अमित ठाकरेंना करोनाची लागण; लिलावती रुग्णालयात दाखल

दोन दिवसांपासून ताप आणि खोकल्याचा त्रास

संग्रहित

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे सुपूत्र अमित ठाकरेंना करोनाची लागण झाली आहे. उपचारासाठी त्यांना लिलावती रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. दोन दिवसांपासून ताप आणि खोकला असल्याने त्यांनी करोना चाचणी केली होती. आज चाचणीचा रिपोर्ट आला असून यामध्ये करोनाची लागण झाली असल्याचं स्पष्ट झालं.

काँग्रेस नेते राहुल गांधींना करोनाची लागण

अमित ठाकरे करोना पॉझिटिव्हट असल्याची माहिती मिळताच राजकीय वर्तुळातून त्यांना प्रकृतीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी ट्विट करत लवकरात लवकर बरे व्हा यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या विद्या चव्हाण यांचं ट्विट

देशात पुन्हा एकदा करोनाने कहर केला असून याचा सर्वाधिक फटका महाराष्ट्राला बसला आहे. अनेक राजकीय नेत्यांनाही करोनाची लागण होत आहे. काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनीही मंगळवारी ट्विट करत आपल्याला करोनाची लागण झाली असल्याची माहिती दिली. याशिवाय माजी पंतप्रधान मनमोहन सिंग, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री अखिलेश यादव, सपा नेते अखिलेश यादव यांनाही करोनाची लागण झाली आहे.

महाराष्ट्रात पुन्हा लॉकडाउन?
राज्यात ३० एप्रिलपर्यंत कडक निर्बंध लावण्यात आले असतानाही अद्याप रुग्णसंख्या नियंत्रणात आलेली नाही. त्यामुळे पुन्हा एकदा कडक लॉकडाउन लावण्याची शक्यता वर्तवली जात आहे. राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी सोमवारी प्रसारमाध्यमांशी बोलताना दोन दिवसांत मुख्यमंत्री यासंबंधी निर्णय घेतील अशी माहिती दिली आहे. दरम्यान राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनीदेखील राज्यात कडक लॉकडाउनची गरज असल्याचं म्हटलं आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 20, 2021 5:27 pm

Web Title: mns leader raj thackeray son amit thackeray tests covid positive sgy 87
Next Stories
1 पुण्यात ऑक्सिजनअभावी रुग्णाचा मृत्यू, योग हॉस्पिटलमध्ये ११ रुग्ण व्हेंटिलेटरवर, पण ऑक्सिजनचा तुटवडा!
2 ज्येष्ठ अभिनेते किशोर नांदलस्कर यांचं करोनाने निधन
3 Maharashtra Lockdown : नियमावलीमध्ये नवे बदल! आता ‘या’ वेळेतच मिळणार किराणा, भाजीपाला!
Just Now!
X