25 May 2020

News Flash

चारही पक्षांची नैतिक पातळी घसरली, पुन्हा जनादेश घ्या! मनसेची मागणी

राज्याच्या सत्तास्थापनेचा पेच सर्वोच्च न्यायालयात

२४ ऑक्टोबरला महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकांचे निकाल लागले. दिलेल्या वेळेत कोणत्याही पक्षाने सरकार स्थापन करण्यात असमर्थता दर्शवल्यामुळे राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली. यानंतर काँग्रेस – राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या ३ पक्षांनी एकत्र येऊन सत्ता स्थापन करण्याची तयारी दाखवली. मात्र शनिवारी सकाळी राज्यपाल भगतसिंह कोश्यारींनी देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांना मुख्यमंत्री आणि उप-मुख्यमंत्रीपदाची शपथ दिली. या घटनेनंतर राज्यात मोठा भूकंप झाला.

देवेंद्र फडणवीसांच्या मुख्यमंत्रीपदाला काँग्रेस-राष्ट्रवादी आणि सेनेने सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलेलं आहे. महाराष्ट्रात सुरु असलेल्या सत्तापेचावर मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी आपली प्रतिक्रीया दिली आहे. राज्यातल्या चारही प्रमुख पक्षांची नैतिक पातळी घसरली आहे, त्यामुळे एक राजकीय कार्यकर्ता आणि मतदार म्हणून पुन्हा एकदा जनादेश घ्यायला हवा अशी पोस्ट संदीप देशपांडे यांनी आपल्या फेसबूक वर टाकली आहे.

नुकत्याच पार पडलेल्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत संदीप देशपांडे मनसेच्या तिकीटावर रिंगणात होते. मात्र दादर-माहित मतदारसंघात शिवसेनेच्या सदा सरवणकरांकडून त्यांना पराभवाचा सामना करावा लागला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 24, 2019 1:31 pm

Web Title: mns leader sandeep deshpande demand re election after political drama in state psd 91
टॅग Mns
Next Stories
1 सुप्रीम कोर्टात नेमके काय घडले? महाराष्ट्रातील सत्तेबाबत हे आहेत महत्त्वाचे मद्दे
2 राष्ट्रवादीचा नवा डाव : राजभवनाला सोपवली आमदारांची लिस्ट, अजित पवारांचेही नाव
3 या सर्व तमाशापेक्षा हुकूमशाहीच आणा- शरद पोंक्षे
Just Now!
X