02 March 2021

News Flash

टी-शर्ट, व्हिडीओ, बॅनर: घुसखोरांविरुद्ध महामोर्चासाठी मनसेची जोरदार तयारी

हिंदह्दयसम्राट आपल्याला बोलू नका असे राज ठाकरेंनी बजावल्यामुळे काही कार्यकर्त्यांनी हिंदूजननायक अशी टी-शर्ट छापली आहेत.

मुंबईसह महाराष्ट्रात बेकायदा वास्तव्य करणाऱ्या पाकिस्तानी, बांगलादेशींना घुसखोरांना हाकलून लावण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने उद्या महामोर्चा आयोजित केला आहे. हा महामोर्चा यशस्वी करण्यासाठी मनसेची जोरदार तयारी सुरु आहे. जास्तीत जास्त लोकांनी मोर्चामध्ये सहभागी व्हावे, यासाठी सोशल मीडियावरुन जोरदार प्रचार केला जात आहे. मुंबईत काही ठिकाणी मनसेच्या कार्यकर्त्यांनी टेबल लावून मोर्चाला येणाऱ्या नागरिकांची नाव नोंदणी सुरु केली आहे.

हिंदूह्दयसम्राट आपल्याला बोलू नका असे राज ठाकरेंनी बजावल्यामुळे काही कार्यकर्त्यांनी हिंदूजननायक अशी टी-शर्ट छापली आहेत. काहींनी मोर्चासाठी खास राज ठाकरेंच्या आवाजातील व्हिडीओ बनवले आहेत. एकूणच महामोर्चासाठी मनसेकडून जोरदार वातावरणनिर्मिती सुरु आहे.

पिंपरी-चिंचवड शहरात देखील महत्वाच्या परिसरात पाकिस्तान आणि बांगलादेशी घुसखोरांना हाकलून दिले पाहिजे अशा आशयाचे फलक लावण्यात आले आहेत तसेच त्याचे फोटो व्हाट्सअॅपवरून पसरविण्यात येत आहेत.
राज ठाकरे यांनी आपल्या पक्षाचा झेंडा बदलून नवीन भूमिका हाती घेतली आहे. देशासह महाराष्ट्रात बेकायदा राहत असलेल्या बांगलादेशी आणि पाकिस्तानमधील नागरिकांना हाकलून दिले पाहिजे अशी भूमिका त्यांनी घेतली.

पिंपरी-चिंचवड शहरात महत्वाच्या परिसरात देशासह महराष्ट्रात बेकायदा राहात असलेल्या पाकिस्तानी आणि बांगलादेशी नागरिकांना हाकलून दिले पाहिजे असे फलक लावण्यात आले असून ते नागरिकांचे लक्ष वेधून घेत आहेत. भारत म्हणजे काही धर्मशाळा नाही, पाकिस्तान आणि बांगलादेशी नागरिकांना हाकलून दिले पाहिजे. महामोर्चात सामील व्हा असे आवाहन या फलकाद्वारे नागरिकांना करण्यात आले आहे. संबंधित फलक हे स्थानिक मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी लावले आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 8, 2020 10:46 am

Web Title: mns organised mahamorcha against bangladeshi pakistani infiltrators in mumbai kjp 91 dmp 82
Next Stories
1 धक्कादायक! गावात आलेल्या प्रवचनकाराने विवाहितेला प्रेमाच्या जाळयात ओढून पळवलं
2 पत्नीच्या खुनाबद्दल तरुणाला जन्मठेपेची शिक्षा
3 शेतकऱ्यांच्या ‘नाईट लाईफ’चीही चिंता करा
Just Now!
X