या देशात निवडणुका प्रतिकांवर होतात हे सत्य आहे असं मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी म्हटलं आहे. मोदींकडे पाहून लोक मतदान करतात, इतर कोणाकडे पाहूनही मतदान करत नाहीत. हे भाजपालादेखील माहिती आहे. शिवसेनेलाही बाळासाहेबांमुळेच सत्ता मिळाली असं त्यांनी सांगितलं आहे. महाराष्ट्राच्या राजकारणाचा भविष्यवेध घेण्याच्या निमित्ताने ‘लोकसत्ता’कडून आयोजित ‘दृष्टी’ आणि ‘कोन’ या दूर-संवादमालिकेत ते बोलत होते.

मास्क घालण्यास तुमचा विरोध का?; राज ठाकरेंनी दिलं उत्तर

भाजपा एकाच नेत्याच्या भोवती चालणारा पक्ष आहे का? या प्रश्नाचं उत्तर देताना राज ठाकरेंनी सांगितलं की, “पूर्वीदेखील असंच होतं…अटलजी आणि अडवाणीजी हीच दोन माणसं होती. आता नरेंद्र मोदी आहेत. मोदींकडे पाहून लोक मतदान करतात, इतर कोणाकडे पाहूनही मतदान करत नाहीत. हे भाजपालादेखील माहिती आहे. शिवसेनेलाही बाळासाहेबांमुळेच सत्ता मिळाली”.

“१९९८ मध्ये कांदा विषयावर निवडणूक झाली होती, राजकीय पक्ष वैगैरे सोडून द्या…कांद्याचे भाव वाढले यावर लोकसभेची निवडणूक झाली होती. या देशात निवडणुका प्रतिकांवर होतात हे सत्य आहे. मग ती प्रतिकं कधी नेते असतात तर कधी आंदोलनं असतात,” असं स्पष्ट मत राज ठाकरेंनी व्यक्त केलं आहे.

“धडा न घेता आपण निवडणुका, कुंभमेळा, राजकारणात गुंतलो”; राज ठाकरेंनी व्यक्त केला संताप

मनसे आहे म्हणून राज ठाकरे आहे
राज ठाकरे आणि मनसे याची तुलना केल्यास विसंवादी दिसते असं विचारण्यात आलं असता राज ठाकरेंनी सांगितलं की, “मनसे आहे म्हणून राज ठाकरे आहे. माझं तोंड आणि सहकाऱ्यांचे हात याच कॉम्बिनेशनवरती सगळा पक्ष असतो. कदाचित कडवट बोलण्यामुळे मी लक्षात राहत असेन आणि माझे सहकारी यांच्या हातवाऱ्यांमुळे लक्षात राहत असतील. पण शेवटी पक्ष म्हणूनच नेता ओळखला जातो. मी व्याख्यान देणारा कोणी आहे म्हणून लोक ओळखतात असं नाही. एका राजकीय पक्षाचा नेता म्हणूनच माझ्याकडे पाहिलं जातं. माझे सहकारी, माझा महाराष्ट्र सैनिक त्यांच्यामुळेच माझी ओळख आहे”.

माझं तोंड आणि सहकाऱ्यांचे हात याच कॉम्बिनेशनवर सगळा पक्ष – राज ठाकरे

राज ठाकरेंच्या व्यक्तिमत्वाचा प्रभाव अबाधित आहे मात्र मनसेचा नाही असं का? विचारलं असता ते म्हणाले की, “यश हेच सगळं सागतं…माहिती नसणारी माणसं निवडून आली की त्यांचं महत्व कळतं. पण जेव्हा ती निवडून आलेली नसतात तेव्हा हे संपले की काय विचारतात. सर्वसामान्यांना नरेंद्र मोदींनंतर कोण माणसं आहेत विचारलं तर सांगता येणार नाही. राज्य मंत्रीमंडळातीलही मुख्यमंत्र्यानंतरची दोन तीन सोडले तर नावं सांगता येणार नाही. सर्वच राजकीय पक्षांमधील प्रमुख व्यक्ती ते सोडून इतरांची नावं होण्यासाठी वेळ घालवावा लागतो”.

पुढे ते म्हणाले की “अनेकांना राजकीय पक्षांचा इतिहासच माहिती नसतो. कित्येक लोक अनेकांना माहिती नव्हती, सत्तेत आल्यानंतर ती कळू लागली. आज माझ्या पक्षाला १५ वर्ष झाली आहेत, तिथे ५०, ६० वर्ष झालेल्या पक्षातील लोकांना ओळखत नाही, माझं काय घेऊन बसलात”.

“२००९ ते २०१२ पर्यंत मनसेच दिसत होती. २०१४ मध्ये मोदी लाट आल्यानंतर सगळेच राजकीय पक्षांना चापट्या बसल्या, तशा मलाही बसल्या. माझ्या १५ वर्षाच्या पक्षाचं काय घेऊन बसलात, ज्या एका पक्षाने देशात ६५ वर्ष सत्ता गाजवली त्या काँग्रेसची परिस्थिती बघा. मी कोणासोबत