“कोरोनाचं संकट अभूतपूर्व आहे पण त्या काळात सरकारवर टीका करण्याची वेळ नव्हती. दोन्ही सरकारच्या चुका झाल्या पण ती वेळ राजकारण करण्याची नव्हती म्हणून विरोधी पक्षांनी जबाबदारीने वागायला हवं होतं. भविष्यात ह्यावर बोलू” असे म्हणत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी अप्रत्यक्षरित्या भाजपावर टीका केली आहे. ते ‘माझा महाराष्ट्र माझं व्हिजन’ या एबीपी माझाच्या कार्यक्रमात बोलत होते. यावेळी बोलताना राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरे यांच्या कामावरही टीका केली.

कोरोनाच्या काळात मी घराबाहेर जाणं टाळलं कारण मी बाहेर गेलो असतो तर माझ्या कार्यकर्त्यांनी गर्दी केली असती त्यातून संसर्गाची भीती होती पण जे सरकारमधल्या लोकांनी मात्र घराबाहेर पडणं आवश्यक होतं. उद्धव ठाकरे टीव्हीवर दिसत होते, त्या सरकारचा कारभार दिसला नाही. राज्य केंद्राकडे बोट दाखवतंय, केंद्र राज्यांकडे बोट दाखवतंय, पण लोकांना ह्याविषयी घेणं देणं नाही. लोकांची एकच अपेक्षा आहे की आम्हाला यातून सोडवा, असे राज ठाकरे म्हणाले.

“या सगळ्या गोष्टी आपण २३ मार्चपासून पाहतोय. सुरूवातीला कुणालाच त्याचा अंदाज नव्हता. आज जेव्हा सगळी आकडेवारी पाहतो. परंतु, आज आपण आकडा पाहिला. मागील महिना दीड महिन्यांपासून बाहेर पडताहेत. हा आकडा माझ्या मनात प्रश्नचिन्ह निर्माण करतो. १३० कोटींच्या देशात १३ लाख रुग्ण आहेत. यात २७ हजार रुग्णांचा मृत्यू झाला. पण हे किती काळ चालवणार आहोत. लोकांच्या नोकऱ्यांचा प्रश्न निर्माण झाला आहे. व्यवसाय बुडले आहेत. या आकड्याकडे पाहिलं, तर अख्खा देश लॉकडाउनमध्ये ठेवणं गरजेचं आहे का?. मी मुख्यमंत्री, अजित पवार आणि शरद पवार यांना फोन करून सांगितलं की बस झालं आता. लोकांना वेठीस धरू शकत नाहीत,” असं सवाल राज ठाकरे यांनी उपस्थित केला.

उद्धव ठाकरे मला फक्त टीव्हीवरच दिसले – राज ठाकरे
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मला टीव्हीवरच दिसले. पण त्यांचा कारभार दिसला नाही. सरकारने कारभाराला सुरुवात केली आणि करोना आला. त्यांच्या कारभाराबद्दल फार काही बोलता येणार नाही. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, आरोग्य मंत्री राजेश टोपे आणि विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस राज्यभर फिरत आहेत. पण मुख्यमंत्री बाहेर फिरताना दिसत नाहीत, असे ते म्हणाले.

भूमिपूजनाची वेळ योग्य नाही – राज ठाकरे
राममंदिर व्हायलाच हवं, ज्यासाठी असंख्य करसेवकांनी त्यासाठी प्राणांची आहुती दिली त्यामुळे राममंदिराचं भूमिपूजन व्हायला हवं पण सध्याची परिस्थिती बघता भूमिपूजनाची वेळ योग्य नाही. लोकांच्या मनातील करोनाची भीती दूर झाल्यावर सगळं स्थिरस्थावर झाल्यावर राममंदिराचं धुमधाकडक्यात भूमिपूजन व्हायला हवं. हा लोकांच्या आनंदाचा भाग आहे त्यामुळे त्याचं ई-भूमिपूजन नको त्याचं जल्लोषात भूमिपूजन हवं.

राज्य सरकारमध्ये ताळमेळ नाही – राज ठाकरे
राज्यातील तीन पक्षांचं सरकार फार काळ टिकेल असं वाटत नाही कारण ह्या तिन्ही पक्षांमध्ये कोणताही संवाद दिसत नाहीये ताळमेळ जाणवत नाहीये