News Flash

#Corona: आधीच देशात रोगराई, त्यात अजून एक वाढला तर काय फरक पडतो – राज ठाकरे

सध्या जगभरात करोना व्हायरसने थैमान घातलं असून जगभरात चार हजाराहून अधिक नागरिकांचा मृत्यू झाला आहे

सध्या जगभरात करोना व्हायरसने थैमान घातलं असून जगभरात चार हजाराहून अधिक नागरिकांचा मृत्यू झाला आहे. भारतातही करोना व्हायरसने घुसखोरी केली असून महाराष्ट्रातील ११ जणांना लागण झाली आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी करोनासंबंधी बोलताना आधीच या देशात रोगराई आहे त्यात अजून एक वाढला तर काय फरक पडतो असं म्हटलं आहे. यावेळी त्यांनी काळजी घेतली पाहिजे यामध्ये कोणताही वाद नसल्याचं सांगत महाराष्ट्रात कोणाला लागण होता कामा नये असंही म्हटलं. औरंगाबादमध्ये शिवजयंती साजरी करताना त्यांनी हे वक्तव्य केलं.

शिवजयंती तारखेला साजरी करावी की तिथीला ?
यावेळी राज ठाकरे यांनी शिवजयंती तिथीनुसार का साजरी करावी याचं कारण सांगितलं. “आपण जे वर्षभर सण साजरे करतो ते तिथीनुसार करतो. कोणताच सण तारखेनुसार साजरा केला जात नाही. त्यामुळे महाराजांची जयंती तिथीनुसार साजरी झाली पाहिजे,” असं राज ठाकरेंनी सांगितलं.

आणखी वाचा- शिवजयंती तिथीनुसार का साजरी करावी? राज ठाकरेंनी दिलं ‘हे’ उत्तर

यावेळी राज ठाकरे यांनी महाराष्ट्रात ३६५ दिवस शिवजयंती साजरी झाली पाहिजे असं मत व्यक्त केलं. महाराजांची जयंती एक सण तो त्याप्रमाणेच साजरा झाला पाहिजे असंही ते म्हणाले आहेत.

आणखी वाचा- महाराष्ट्रात ३६५ दिवस शिवजयंती साजरी झाली पाहिजे – राज ठाकरे

“मी काही वर्षांपूर्वी जयंत साळगावकर यांच्याकडे गेलो होतो. त्यांना मी तेव्हा शिवजयंती तारखेनुसार साजरी करायची की तिथीनुसार असं विचारलं होतं. यावर त्यांनी सांगितलं की, ३६५ दिवस करायची. पण तिथीनुसार का याबद्दल सांगायचं झालं तर, आपण जे वर्षभर सण साजरे करतो ते तिथीनुसार करतो. कोणताच सण तारखेनुसार साजरा केला जात नाही. त्यामुळे महाराजांची जयंती तिथीनुसार साजरी झाली पाहिजे. महाराजांची जयंती आपल्यासाठी एक सण आहे. त्यामुळे तो एका सणाप्रमाणेच साजरा झाला पाहिजे,” असं राज ठाकरेंनी सांगितलं.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 12, 2020 4:18 pm

Web Title: mns raj thackeray coronavirus shivjayanti aurangabad sgy 87
Next Stories
1 मध्य प्रदेशपाठोपाठ ‘ऑपरेशन लोटस’ महाराष्ट्रातही होईल का?; महाराष्ट्रातील जनता म्हणते…
2 शिवजयंती तिथीनुसार का साजरी करावी? राज ठाकरेंनी दिलं ‘हे’ उत्तर
3 खासदार जयसिद्धेश्वर स्वामींना हायकोर्टाचा तात्पुरता दिलासा
Just Now!
X