मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या हस्ते पक्षाच्या नव्या झेंड्याचं अनावरण करण्यात आलं आहे. मनसेचं महाअधिवेशन आज पार पडत असून राज ठाकरे यांनी यावेळी पक्षाच्या नव्या झेंड्याचं अनावरण केलं. मनसेच्या नव्या झेंड्यात भगवा रंग असून त्यावर छत्रपती शिवाजी महाराजांची राजमुद्रा आहे. या झेंड्याचा फोटो काही दिवसांपूर्वी समोर आला होता. मात्र पक्षाकडून अधिकृत घोषणा झाली नव्हती. आज अखेर राज ठाकरे यांनी अधिकृतपणे नव्या झेंड्याचं अनावरण केलं.

narendra modi
बहुसंख्य हिंदू तर मांसाहारीच!
arvind kejriwal
अरविंद केजरीवालांचे वजन घटले नाही, तर १ किलो वाढले? भाजपा नेत्याच्या दाव्याने चर्चांना उधाण!
CM Mamata Banerjee On Attack NIA team
‘एनआयए’च्या पथकावर जमावाचा हल्ला, ममता बॅनर्जी यांनी तपास यंत्रणेच्या अधिकाऱ्यांनाच सुनावले, म्हणाल्या, “मध्यरात्री लोकांच्या घरात…”
jitendra awhad marathi news, lucky compound building collapse marathi news
“लकी कंपाऊंड दुर्घटनेनंतरही अधिकाऱ्यांनी शिकायला हवे होते, पण…”, आमदार जितेंद्र आव्हाड यांची पालिका अधिकाऱ्यांवर टीका

राज ठाकरे यांनी झेंड्याचं अनवारण करण्याआधी शिवसेना पक्षप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या ९४ व्या जयंतीनिमित्त श्रद्धांजली वाहिली. तसंच आपण संध्याकाळी भाषण करणार असून त्यात सविस्तर बोलणार असल्याची माहिती दिली.

आणखी वाचा – मनसेच्या स्टेजवर पहिल्यांदाच स्वातंत्र्यवीर सावरकरांची प्रतिमा

मनसेने याआधी अधिकृत ट्विटर हँडलवरुन पक्षचिन्हाच्या मागे असलेला झेंडा हटवला होता. त्याआधीपासून मनसे झेंडा बदलणार असल्याची चर्चा सुरु झाली होती. मात्र ट्विटरवर बदल केल्यानंतर तसे संकेत मिळाले होते. पक्षाच्या आधीच्या झेंड्यात निळा, भगवा आणि हिरवा असे तीन रंग होते. मात्र आता त्यात बदल करण्यात आला असून चार रंगांऐवजी फक्त एकच भगवा रंग आहे. तसंच भगव्या रंगाच्या या झेंड्यावर छत्रपती शिवाजी महाराजांची राजमुद्रा आहे.