05 June 2020

News Flash

“…असे विकृत ठेचलेच पाहिजेत”, मनसेकडून जितेंद्र आव्हाड प्रकरणावर प्रतिक्रिया

एका तरुणाने जितेंद्र आव्हाड यांच्या समर्थकांनी आपल्याला मारहाण केल्याचा आरोप केल्याने सध्या वाद निर्माण झाला आहे

एका तरुणाने जितेंद्र आव्हाड यांच्या समर्थकांनी आपल्याला मारहाण केल्याचा आरोप केल्याने सध्या वाद निर्माण झाला आहे. एकीकडे भाजपाकडून जितेंद्र आव्हाड यांच्यावर कडक कारवाई करावी अशी मागणी केली जात असताना मनेसकडून मात्र जितेंद्र आव्हाड यांचं समर्थन करण्यात आलं आहे. मनसेच्या नेत्या रुपाली ठोंबरे यांनी जितेंद्र आव्हाड यांची बाजू मांडताना विकृत पोस्ट केली म्हणून मारले असेल तर चांगलंच केलं असं म्हटलं आहे.

रुपाली ठोंबरे यांनी काय म्हटलं आहे –
“अरे काहीही पोस्ट, कमेंट..काही करणार का. सोशल मीडिया आहे आपल्या विकृतीचे साधन नाही हो. चांगले घ्या की सोशलमधून. बरी विकृती करायला हात, मन धजावते कसे. मंत्री असो, सेलिब्रिटी असो की कोणत्याही पक्षाचा कार्यकर्ता, पदाधिकारी… कमेंट विकृत करूच नये आणि केली तर विकृतीप्रमाणे मार खावा. जितेंद्र आव्हाड यांच्याबाबत जी काही विकृत पोस्ट केली म्हणून त्याला मारले असेल तर चांगलेच केले असे विकृत ठेचले पाहिजे. सोशल मीडियावर ही विकृती संपवली पाहिजे,” असं रुपाली ठोंबरे यांनी म्हटलं आहे.

आणखी वाचा- “जितेंद्र आव्हाड तुझा दाभोलकर होणार…”

काय आहे प्रकरण ?
राज्यात करोनानं चिंता वाढवलेली असताना जितेंद्र आव्हाड यांचं नाव एका प्रकरणामुळे मंगळवारपासून चर्चेत आलं आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून जितेंद्र आव्हाड यांच्याविरोधात पोस्ट लिहिणाऱ्या तरुणाला त्यांच्या कार्यकर्त्यांनी बेदम मारहाण केल्याचा आरोप होत आहे. ठाण्यातील एका व्यक्तीनं जितेंद्र आव्हाड यांच्या बंगल्यावर त्यांच्या कार्यकर्त्यांकडून बेदम मारहाण करण्यात आल्याची तक्रार पोलीस ठाण्यात केली आहे.

आणखी वाचा- जितेंद्र आव्हाडांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करा; देवेंद्र फडणवीस यांची मागणी

माझ्या बंगल्यावर असा कोणताही प्रकार झाला नाही – आव्हाड
आरोप जितेंद्र आव्हाड यांनी फेटाळून लावले आहेत. “माझ्या बंगल्यावर असा कोणताही प्रकार झाला नाही. या घटनेबद्दल मला माहिती नाही. मी रात्री झोपलेला होतो. त्या दिवशी मी दिवसभर माझ्या विभागात काम करत होतो. त्यामुळे रात्री घरी येऊन झोपलो. मी मारहाणीचे समर्थन करणार नाही, पण त्याने जी पोस्ट माझ्याबद्दल टाकली. तशी पोस्ट कोण सहन करेल? माझा नग्न फोटो टाकला होता. असे फोटो त्याच्या नातेवाईकांबद्दल टाकल्यावर तो गप्प बसेल का? भाजपाचे नेते तरी हे सहन करतील का?,” अशी भूमिका आव्हाड यांनी मांडली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 9, 2020 9:18 am

Web Title: mns rupali thombre supports ncp jitendra awhad sgy 87
Next Stories
1 Coronavirus Outbreak : सायंकाळी पाचनंतर किराणा, भाजीही बंद
2 शेतातील भाजी थेट सोसायटीत
3 Coronavirus : करोनाबाधित रुग्ण १२०
Just Now!
X