महाराष्ट्रात पुन्हा एकदा मराठी भाषेचा मुद्दा समोर आला आहे. राज्यात मराठी भाषेचाच वापर झाला पाहीजे म्हणून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची नेहमी आक्रमक भूमिका असते. दरम्यान मनसेने आयसीआयसीआय बॅंकेला इशारा दिल्यानंतर बॅंकेने मराठी भाषेत फलक लावले आहे. यापुर्वी बॅंकेने गुजराती भाषेचा वापर केला होता.  महाराष्ट्राची भाषा ही मराठी आहे गुजराती नाही हे बॅंकेला मनसेच्या इशाऱ्यानंतर कळलं, अशी माहिती मनसे नेते अखिल चित्रे यांनी दिली आहे. 

यापुर्वी देखील मनसेने दादर आणि माहिममधील दुकानांवरील गुजराती भाषेतील पाट्या हटवल्या होत्या. दादरमधील एका ख्यातनाम ज्वेलर्सवर आणि माहिममधील एका हॉटेलवर मनसेने धडक दिली होती. आता पुन्हा एकदा मनसेने मराठी भाषेचा मुद्दा हाती घेतला आहे.

uddhav thackeray latest marathi news
“महाराष्ट्रद्वेष्टे सरकार घालवून द्या”, उद्धव ठाकरे यांचे आवाहन; म्हणाले, “एक नेता एक पक्ष असे…”
Actor Makrand Anaspure
महाराष्ट्रातल्या राजकीय परिस्थितीवर मकरंद अनासपुरेंचं परखड भाष्य, “आम्हा मतदारांची फसवणूक…”
Sanjay Raut talk about Monopoly of mp and mla in Western Maharashtra in sangli
पश्चिम महाराष्ट्रातील काही लोकांना आपलीची मक्तेदारी असे वाटते- संजय राऊत
What Aditya Thackeray Said?
“४० गद्दारांनी आता विचार करावा..”, आदित्य ठाकरेंचं महत्त्वाचं वक्तव्य

यापुर्वी अनेक कार्यक्रमात राज ठाकरेंनी हिंदी भाषेच्या सक्तीला विरोध दर्शवला आहे. हिंदी ही भारताची राष्ट्रभाषा नाही. मग सध्या सर्वत्र या भाषेची सक्ती करण्याचे प्रयत्न का सुरु आहे ,असा सवाल त्यांनी विचारला होता.

तसेच गेल्यावर्षी मराठीच्या मुद्द्यावरुन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आक्रमक भूमिका घेतल्यानंतर अ‍ॅमेझॉन बॅकफूटवर गेलं आहे. अ‍ॅमेझॉनने आपल्या सर्व डिजिटल प्लॅटफॉर्मवर मराठी भाषेचा समावेश करण्याचं आश्वासन दिलं असल्याची माहिती मनसे नेते अखिल चित्रे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली होती. यासोबतच अ‍ॅमेझॉनकडून राज ठाकरेंची दिलगिरी व्यक्त केल्याचा दावाही अखिल चित्रे यांनी केला होता.