X

राज ठाकरेंच्या व्यंगचित्रावर आक्षेपार्ह कमेंट, मनसेच्या महिला कार्यकर्त्यांकडून तरुणाला मारहाण

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी काढलेल्या व्यंगचित्रावर आक्षेपार्ह कमेंट केल्याप्रकरणी एका तरुणाला मारहाण करण्यात आली आहे

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी काढलेल्या व्यंगचित्रावर आक्षेपार्ह कमेंट केल्याप्रकरणी एका तरुणाला मारहाण करण्यात आली आहे. मनसेच्या महिला कार्यकर्त्यांकडून ही मारहाण करण्यात आली. विशेष म्हणजे मारहाण करणाऱ्या महिला कार्यकर्त्यांचा ठाणे मनसे जिल्हाध्यक्षांकडून सत्कार करण्यात आला.

विवेक भागवत असं या तरुणांचं नाव असून तो बदलापूरचा रहिवासी आहे. विवेक हा नेहमी राज ठाकरेंविरोधात टीका करताना सोशल मीडियावर अपशब्द वापरत असल्याचा कार्यकर्त्यांचा आरोप आहे. महिला कार्यकर्त्यांनी विवेक भागवत याच्या घरचा पत्ता काढत त्याचं घर गाठलं. घरी जाऊन दमबाजी करत विवेक भागवतला मारहाण करण्यात आली. इतकंच नाही तर त्याला माफीही मागण्यास भाग पाडलं.

विवेक भागवत माफी मागत असताना तसंच त्याला मारहाण केली जात असताना कार्यकर्त्यांनी व्हिडीओ शूट केला. कार्यकर्त्यांनी विवेक भागवतला फेसबुक अकाऊंट डिलीट करायला सांगितलं असून, त्याआधी माफीनामा पोस्ट करायला सांगितलं आहे. विशेष म्हणजे मनसे ठाणे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांनी या मारहाणीचं समर्थन करत त्यांचा सत्कार केला.