06 August 2020

News Flash

Video : मनसेचा राडा, लातूरच्या कृषी सहसंचालक कार्यालयाची तोडफोड

बोगस बियाण्यांच्या मुद्द्यावर मनसेचं आंदोलन

खरीपातील सोयाबीनचं बियाणं वांझोटं निघाल्याच्या लातूर जिल्ह्यात तब्बल सहा हजारांपेक्षा जास्त तक्रारी कृषी विभागाकडे आल्या आहेत. सोयाबीनचं बियाणं उगवलंच नसल्याने हजारो शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचं संकट आलं आहे. यावरुन मनसेच्या स्थानिक कार्यकर्त्यांनी कृषी विभागाला आंदोलन करण्याचा इशारा दिला. मात्र याकडे संबंधित विभागाने गांभीर्याने पाहिले नाही. मंगळवारी मनसे शेतकरी सेनेच्या कार्यकर्त्यांनी कृषी सहसंचालकांचे कार्यालयच फोडले.

महाराष्ट्र नवनिर्माण शेतकरी सेनेचे प्रदेशाध्यक्ष संतोष नागरगोजे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी लातूर कृषी संचालक कार्यालयात तुफान राडा करत तोडफोड केली. या कार्यालयाची तोडफोड केल्याप्रकरणी चौघांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. शेतकऱ्यांना नुकसानभरपाईपोटी हेक्टरी २५ हजार रुपये देण्याची मागणी मनसेने केली आहे.

बारा कंपन्यांविरोधात गुन्हे
साडेआठ हजार क्विंटल बियाणे उगवले नाही. कृषी विभागामार्फत १२ कंपन्यांच्या विरोधात गुन्हे नोंद करण्यात आले आहेत. महाबीजने बियाणे बदलून देण्याची तयारी दाखवली आहे तर खासगी कंपन्यांनी पेरणीचा खर्च देण्याची तयारी दाखवल्याचे पालकमंत्री अमित देशमुख यांनी पत्रकार परिषदेत सांगितले असले तरी वस्तुस्थिती मात्र भिन्न आहे. खासगी कंपन्या भरपाई द्यायला तयार असतील तर तोच न्याय महाबीजला का नको? असा प्रश्न आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 16, 2020 8:52 am

Web Title: mns workers vandalised the office of co director of agriculture department in latur nck 90
Next Stories
1 विद्यार्थ्यांच्या गुणपत्रिकेवर ‘कोविड प्रमोटेड’ शिक्का मारण्याचा विचार ही विकृतीच : शिवसेना
2 करोनामुळे जेजुरीच्या खंडोबाची सोमवती यात्रा रद्द
3 राज्यात सोलापूरचा मृत्यूदर सर्वाधिक
Just Now!
X