News Flash

कोल्हापुरात गेम खेळताना मोबाईलचा स्फोट, मुलाचा डोळा निकामी

घरातील सर्व मंडळी शेतीच्या कामासाठी गेली असता सकाळी दहाच्या सुमारास अमोल घराच्या उंबरठ्यावर मोबाईलमध्ये गेम खेळत बसला होता.

मोबाईलवर गेम खेळत असताना अचानक मोबाईलचा स्फोट झाल्याने एका 16 वर्षीय मुलाने डोळा गमावला. कोल्हापूर येथील कागल तालुक्यात ही घटना घडली.

अमोल दत्तात्रय पाटील (वय १६) असे त्या मुलाचे नाव असून, तो मुळचा कागल तालुक्यातील उंदरवाडीचा रहिवासी आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, घरातील सर्व मंडळी शेतीच्या कामासाठी गेली असता सकाळी दहाच्या सुमारास अमोल घराच्या उंबरठ्यावर मोबाईलमध्ये गेम खेळत बसला होता. थोड्या वेळाने मोबाइल गरम झाला आणि त्याचा स्फोट झाला. त्यावेळी मोबाईलमधील पार्टचा एक तुकडा त्याच्या डाव्या डोळ्यात घुसला आणि त्याच्या डोळ्याला गंभीर इजा झाली. जखमी अमोलला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र मोबाईलचा तुकडा लागल्याने अमोलचा डोळा निकामी झाल्याची माहिती डॉक्टरांनी दिली.

गेल्या काही दिवसांपासून मोबाईलचा स्फोट होऊ जखमी होण्याच्या घटनांमध्ये वाढ होताना दिसत आहे. त्यामुळे मोबाईलचा वापर करताना योग्य खबरदारी घेणं गरजेचं आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 3, 2019 9:02 am

Web Title: mobile blast in kolhapur boy lost his eye
Next Stories
1 निधी चौधरींवर कारवाईची शरद पवार यांची मागणी
2 १० कोटी रोजगार निर्माण झाले नाही त्याची जबाबदारी नेहरू-गांधींवर टाकता येणार नाही – उद्धव ठाकरे
3 ‘भाजप-शिवसेनेला विधानसभेसाठी समान जागा’
Just Now!
X