07 December 2019

News Flash

मोबाइलचा स्फोट; मुलाने बोंटे गमावली

घटना मुखेड तालुक्यातील जिरगा येथे घडली.

ऑनलाइन मागविलेल्या मोबाइलवर गेम खेळत असताना अचानक स्फोट होऊन आठ वर्षांच्या मुलाच्या हाताची पाचही बोटे तुटल्याची घटना मुखेड तालुक्यातील जिरगा येथे घडली. श्रीपाद जेमला जाधव या शेतकऱ्याने दीड हजार रुपयांचा मोबाइल मागविला. त्यांचा मुलगा प्रशांत हा या मोबाइलवर गेम खेळत बसला होता. या वेळी अचानक मोठा आवाज होऊन स्फोट झाला. यामुळे त्याने डाव्या हाताच्या तळव्यासह पाचही बोटे गमावली. तसेच मोबाइलचे तुकडे छातीला, पोटाला लागून दुखापत झाली. त्याच्या हाताला दुखापत झाली आहे.

First Published on February 11, 2019 12:11 am

Web Title: mobile explosion in nanded
Just Now!
X