28 September 2020

News Flash

औरंगाबाद : मोबाइलच्या बॅटरीसोबत खेळणं जीवावर, दोघं भाऊ गंभीर जखमी

दोन्ही चिमुकल्या भावंडांना उपचारासाठी घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आलंय

मोबाइल फोनच्या बॅटरीसोबत खेळत असताना अचानक बॅटरीचा स्फोट होवून दोघं भावंडं गंभीर जखमी झाली आहेत. औरंगाबादच्या वैजापूर तालुक्यातील शिवूर येथील घोडके वस्तीवर सोमवारी सकाळी नऊ वाजता ही घटना घडली.

कृष्णा (वय ८)आणि कार्तिक (वय ५) हे दोघे भाऊ मोबाइल फोनची बॅटरी बाहेर काढून तिच्यासोबत खेळत होते. मात्र त्याच वेळी अचानक बॅटरीचा स्फोट झाला. या स्फोटात दोन्ही भावंडांच्या हाताला गंभीर इजा झाली असून त्यांना उपचारासाठी घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

कृष्णा रामेश्वर जाधव आणि कार्तिक रामेश्वर जाधव अशी जखमी भावंडांची नावे आहेत. सकाळी नऊच्या सुमारास घडलेल्या या घटनेनंतर सर्वप्रथम या दोघा भावंडांना शिवूर येथील दवाखान्यात दाखल करण्यात आलं होतं. मात्र, नंतर अधिक उपचारासाठी औरंगाबाद येथील घाटी रुग्णालयात हलवण्यात आलं आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 6, 2019 12:17 pm

Web Title: mobile phone battery blast aurangabad two brothers injured
Next Stories
1 लातूरमध्ये भीषण अपघात, एकाच कुटुंबातील 5 जणांचा मृत्यू
2 यंदाची ‘नीट’ सोपी!
3 अकरावीसाठी नवा अभ्यासक्रम
Just Now!
X