News Flash

चाकूच्या धाकावर ट्रक चालकांचे मोबाईल हिसकावणारी टोळी जेरबंद

आरोपींकडून ११ मोबाईल, चाकू, कैची व सहा मोटरसायकली जप्त

वर्धा‑नागपूर मार्गावर ट्रकची मोठी वाहतूक आहे. रात्रीच्यावेळी ट्रकचालक रस्त्यालगतच्या धाब्यावर विश्रांतीसाठी थांबतात. अशा ट्रकचालकांना चाकूचा धाक दाखवून त्यांचे मोबाईल हिसकल्या जात होते. तसेच ट्रकमध्ये झोपलेल्या चालकाच्या खिशातून रोख रक्कम व मोबाईल जबरीने घेण्याच्या तक्रारी देखील वाढल्या होत्या.

पोलिसांकडे तक्रार दाखल झाल्यावर स्थानिक गुन्हा शाखेने या प्रकरणी तपास सुरू केला. त्यानुसार वर्धा बस स्थानकाजवळील मैदानातील झोपड्यांमध्ये सुगावा लागला. या ठिकाणी छापा टाकल्यावर शाहरूख उर्फ शेख रफी या आरोपीस अटक करण्यात आली. तो हैद्राबादचा राहणारा असून त्याने संजू शिंदे व राजू पवार या स्थानिकांच्या सहाय्याने मोबाईलसोबतच मोटरसायकल चोरीचे गुन्हे केल्याचे कबुल केले.

याचबरोबर वर्धा शहर, सावंगी, सेलू, बुटीबोरी व अन्य ठिकाणी गुन्हे केल्याचे उघडकीस आले. आरोपीकडून ११ मोबाईल, चाकू, कैची तसेच सहा मोटरसायकली जप्त करण्यात आल्या. पोलीस अधिक्षक डॉ. बसवराज तेली यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक निलेश ब्राम्हणे तसेच महेंद्र इंगळे, आशिष मोरखडे, सलिम कुरेशी, निरंजन वरभे, नरेंद्र डहाके, संतोष दरगुडे, गजानन लामसे यांच्या चमूने सायबर सेलच्या मदतीने ही कारवाई केली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 4, 2020 10:01 pm

Web Title: mobile phone snatching gang arrested msr 87
Next Stories
1 पॉझिटिव्ह बातमी! महाराष्ट्रात २४ तासात १२ हजार ३२६ रुग्णांना डिस्चार्ज
2 धक्कादायक : सोलापुरात करोना वॉर्डात सेवा बजाणाऱ्या डॉक्टरची आत्महत्या
3 आज बाळासाहेब हवे होते, राम मंदिर भूमिपूजनाआधी राज ठाकरेंनी व्यक्त केली भावना
Just Now!
X