13 August 2020

News Flash

झारखंडातील टोळीकडून २ लाखाचे मोबाइल जप्त

महागडे मोबाइल पळवणाऱ्या झारखंडातील टोळीचा नांदेडच्या सिडको पोलिसांनी पर्दाफाश केला. टोळीतील आठ जणांच्या मुसक्या आवळत सुमारे दोन लाख रुपयांचे १३ मोबाइल पोलिसांनी जप्त केले. यातील

| September 20, 2014 01:30 am

महागडे मोबाइल पळवणाऱ्या झारखंडातील टोळीचा नांदेडच्या सिडको पोलिसांनी पर्दाफाश केला. टोळीतील आठ जणांच्या मुसक्या आवळत सुमारे दोन लाख रुपयांचे १३ मोबाइल पोलिसांनी जप्त केले. यातील सहा आरोपी अल्पवयीन आहेत.
सिडको पोलीस ठाण्याच्या हद्दीत कौठा परिसरात दर मंगळवारी आठवडी बाजार भरतो. या बाजारात काही महागडे मोबाइल चोरीला जात असल्याच्या तक्रारी आल्यानंतर सहायक पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांच्या सूचनेनुसार सिडकोचे पोलीस निरीक्षक संपत िशदे यांनी सापळा रचला. बाजारातून दोन मोबाइल चोरी गेल्यानंतर पोलिसांनी गस्त वाढवली. दोन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतल्यानंतर त्यांच्याकडे चार मोबाइल सापडले. सुरुवातीला त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. कसून चौकशी करताच टोळीचा पर्दाफाश झाला.
झारखंडच्या साहेबगंज जिल्ह्यातील तालाजरी येथील हे आठ जण िहगोली गेट परिसरात भाडय़ाच्या खोलीत राहात होते. दिवसभरात आठवडी बाजार, सार्वजनिक व गर्दीच्या ठिकाणी मोबाइल चोरायचे, हा त्यांचा उद्योग होता. चोरलेले मोबाइलची कोलकाता येथे ते विक्री करीत असल्याचे निष्पन्न झाले. सर्व आरोपी मोबाइल चोरल्यानंतर पश्चिम बंगालच्या सीमेवर विकत असल्याने त्याचे लोकेशन मिळत नव्हते. आतापर्यंत त्यांनी किती मोबाइल चोरले याची माहिती पोलीस घेत आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 20, 2014 1:30 am

Web Title: mobile seized in jharkhand gang
टॅग Nanded
Next Stories
1 समाजकल्याण अधिकारी लाचलुचपतच्या जाळय़ात
2 ‘शिवसेनेने माघार घ्यावी, भाजपनेही आग्रह सोडावा’
3 समता कॉलनीत पती-पत्नीचा निर्घृण खून
Just Now!
X