News Flash

“आत्ममग्न पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ‘नव्या भारताचा पाया’ स्मशानातील चितांचा धूर आणि गंगेत वाहणाऱ्या शवांनी रचला…”

काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांची घणाघाती टीका

संग्रहीत फोटो

“एकेकाळी देशातून सोन्याचा धूर निघत असे अशी भारताची ख्याती होती असे सांगितली जाते. आत्ममग्न प्रधानमंत्री नरेंद्र मोदींनी “नव्या भारताचा पाया” स्मशानातील चितांचा धूर आणि गंगेत वाहणाऱ्या शवांनी रचला अशी भीषण परिस्थिती आज देशात आहे.” अशी घणाघाती टीका काँग्रेस नेते व माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी आज पत्रकारपरिषदेत बोलताना पंतप्रधान मोदींवर केली.

मोदी सरकारला आज सात वर्षे झाली आहेत. या पार्श्वभूमीवर पृथ्वीराज चव्हाण विविध मुद्यांवरून पंतप्रधान मोदी व केंद्र सरकारवर निशाणा साधताना म्हणाले, “एप्रिल ते जून दरम्यान भारताचा आर्थिक दर ऐतिहासिक घसरला, आंतरराष्ट्रीय बाजरात कच्च्या तेलाच्या किंमती कमी असताना देशात पेट्रोल आणि डिझेलच्या किमती कमी झाल्या नाहीत. देशात दडपशाही, हुमूकशाही पाहायला मिळते आहे. पहिल्या पाच वर्षात नोटबंदी सारखा चुकीचा निर्णय, जीएसटीचा ढिसाळ कारभार समोर आला. सर्वात जुना पक्ष शिवसेना आणि अकाली दल मोदींपासून दूर गेले. कुणाशी सल्लामसलत न करता विरोधी पक्षाशी नबोलता कृषी कायदे आणले गेले, त्यामुळे देशात प्रचंड मोठा असंतोष आहे. तसेच, मोदींनी पुलवामा शहिदांचा राजकीय वापर केला. विकासाऐवजी विखारी राष्ट्रवाद हा मोदींचा अजेंडा आहे. त्यामुळे मोदींची जगभर नाचक्की झाली.”

मोदी-शाह यांचा दडपशाहीचा कारभार असल्याचा आरोप –
“मोदी-शाह यांचा दडपशाहीचा कारभार असून, ३७० कलम रद्द करून दंडुकेशाही राबवली. बहुमत नसतांना कायदा पास केला आणि हिंदू-मुस्लीम वाद उभा केला. हिंदुत्वाचा अजेंडा सुरू केला. विद्यार्थ्यांनी आंदोलन केलं तर त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल केला, आंदोलन चिरडून टाकली. करोना सुरू होण्याआधी सर्वात निच्चांकी दर होता. मोदींनी अहंकाराच्या पायी अर्थव्यवस्था रसातळाला नेली. भारताचे दरडोई उत्पन्न बांगलादेश पेक्षा कमी झालं. आत्मनिर्भर बनविण्यासाठी अनेक ठिकाणी खासगीकरण केलं, वाट लावली.”

आंतरराष्ट्रीय राजकारण, कृषी कायदे, चीन सोबत तणापूर्ण संबंध –
“ आंतरराष्ट्रीय राजकारण सुरू केलं आणि त्यामुळे ट्रम्प पडले त्यामुळे नवे राष्ट्राध्यक्ष भारताशी थोडं सांभाळून वागताय. ४५ वर्षात जे कधी घडलं नाही ते घडलं, लडाखमध्ये २० जवान शहीद झाले. चीनने आक्रमण करूनही मोदी गप्प का राहिले? भारत आणि चीनचे संबंध मोठ्या प्रमाणात बिघडले. मोदींच्या अहंकाराला सीमा राहिली नाही, मोदींनी तीन कायद्यात सुधारणा केल्या, शेतकऱ्यांना वेठीस धरले. विरोधी पक्ष आणि तज्ज्ञांचा सल्ला न घेता कायदे केले.सहा महिने झाले आंदोलन सुरू आहे.”

मोदी करोना काळात अकार्यक्षम पंतप्रधान –
“मोदी करोना काळात अकार्यक्षम पंतप्रधान ठरले असून टाळेबंदी करतांना कुठलेही नियोजन नाही. परप्रांतीय यांच्या मोठ्या रांगा लागल्या, लोक चिरडून मेली. करोनात साडेबारा हजार कोटी रुपयांचे रोजगार गेले, त्यांना कुठल्याही प्रकारची मदत नाही. फसव्या आर्थिक मुळे कुठलाही दिलासा मिळाला नाही. लस नियोजन करता आलं नाही, बाहेर लस गेली. २० ऑक्टोबर २०२० ला केंद्रीय आरोग्य सचिव यांनी ऑक्सिजन वर बोलले होते.१ लाख टन लिक्विड ऑक्सिजन आयात करण्याचा निर्णय घेतला असं सांगितलं, तेव्हा ते खोट बोलल्याचे समोर आलं. करोनाच्या काळात फक्त घोषणा केल्या मात्र प्रत्यक्षात काहीही केलं नाही. मोफत लस देण्याचा विषय होता, आता काय सुरुय बघा. राज्य सरकार आणि उद्योगपती यांच्याकडे लसीकरणाचा विषय ढकलताय.” असा आरोप पृथ्वीराज चव्हाण यांनी केला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 30, 2021 6:16 pm

Web Title: modi became an inefficient prime minister during the corona period prithiviraj chavan msr 87
Next Stories
1 अनिल परब यांच्यासाठी वेगळे नियम का?; नितेश राणेंचा सवाल
2 महाराष्ट्रात लॉकडाउन वाढणार?; उद्धव ठाकरे आज साधणार राज्यातील जनतेशी संवाद
3 “…तर बाळासाहेब वरुन थोबाडीत मारतील,” चंद्रकांत पाटलांचा संजय राऊतांना टोला
Just Now!
X