19 October 2019

News Flash

#ModiGoBack ची सुरूवात भाजपाच्या गोटातून? धनंजय मुंडेंना पडला प्रश्न

भाजपाच्या गोटात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविषयी नाराजी आहे. 

संग्रहित छायाचित्र

मागील दोन दिवसांपासून सोशल मीडियावर #ModiGoBack हा हॅशटॅग ट्रेडिंगमध्ये आहे. यामध्ये आता राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांनी उडी घेतली आहे. #ModiGoBack या कॅम्पेनची सुरूवात भाजपाच्या गोटातूनच तर सुरू झाली नाही ना? असा प्रश्न धनंजय मुंडे यांनी ट्विटरवर उपस्थित केला आहे. भाजपाच्या गोटात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविषयी नाराजी आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे नाव पंतप्रधानपदाचे उमेदावर म्हणून भाजपाच्या काही नेत्यांनी पुढे केले होते. हाच धागा पकडत मुंडे यांनी पंतप्रधान आणि भाजपावर टीकास्त्र सोडलं आहे.

गोव्यात होणाऱ्या एका उद्घाटनाचे पोस्टर मुंडे यांनी आपल्या ट्विटवर पोस्ट केले आहे. त्यामध्ये नितीन गडकरी आणि मनोहर पर्रीकर यांचाच फोटो आहे. मोदी यांचा फोटो भाजपाच्या पोस्टरवर दिसत नाही. मुंडे यांनी या संधीचा फायदा घेत भाजपाला ट्रार्गेट केलं आहे. मुंडे यांनी #ModiGoBack कॅम्पेनची सुरूवात भाजपाच्या गोटातूनच तर सुरू झाली नाही ना?, मोदी भाजपच्या डोळ्यात तर खुपत नाही ना? RSSला मोदी जड तर झाले नाही ना? असे प्रश्न उपस्थित केले आहेत. गोव्यातील विकासकामांच्या जाहिरातीत झळकणाऱ्या मोदींचा चेहरा, गोव्यातील विकासकामांच्या जाहिरातीत दिसला नाही म्हणून प्रश्न पडत आहेत, असे मुंडे ट्विटवर म्हणाले आहेत.

मोदी यांच्या तामिळनाडूतील मदुराई दौऱ्यापासून सोशल मीडियावर #GoBackModi हा हॅशटॅग ट्रेन्ड होतोय. ट्विटर युजर्सनी मीम्स, व्यंगचित्र, छायाचित्रे आणि काही व्हिडिओच्या माध्यमातून पंतप्रधानांवर निशाणा साधला आणि दिल्लीला परतण्याचे आवाहन केले.

First Published on January 29, 2019 4:49 pm

Web Title: modigoback campaign begins in bjp