26 October 2020

News Flash

रद्दीतून वंचितांची दिवाळी साजरी होणार

अकोल्यातील सामाजसेवक पुरुषोत्तम शिंदेंचा उपक्रम

पुरुषोत्तम शिंदे

अकोल्यातील सामाजसेवक पुरुषोत्तम शिंदेंचा उपक्रम

अकोला : वृत्तपत्रांच्या रद्दी विक्रीतून मिळणाऱ्या पैशांमधून गरीब, गरजू व वंचितांना दिवाळीचा गोडवा देण्याचा सामाजिक उपक्रम स्वराज सामाजिक संस्थेच्या माध्यमातून पुरुषोत्तम शिंदे राबवणार आहेत. गेल्या १५ वर्षांपासूर ते निरंतर हा उपक्रम राबवत आहेत.

दिवाळी हा वर्षांतील सर्वात मोठा सण. गरिबांना मात्र दिवाळीच्या आनंदापासूनही वंचित राहण्याची वेळ येते. त्यांची ही दिवाळी साजरी व्हावी म्हणून अनेक सामाजिक संघटना पुढाकार घेतात. समाजाला अशा उपक्रमात सहभागी करून गरिबांना दिवाळीचा आनंद देण्यात त्यांचाही खारीचा वाटा राहावा म्हणून स्वराज सामाजिक संस्था गेल्या १५ वर्षांपासून नागरिकांकडून वृत्तपत्राची रद्दी गोळा करते. जमा केलेली रद्दी विकून आलेल्या पैशांमधून गरजू आणि गरिबांची दिवाळी साजरी करण्यासाठी त्यांना कपडे, फराळ देण्याचा उपक्रम दरवर्षी दिवाळीत राबवला जातो. यावर्षीही हा उपक्रम अखंडितपणे राबवण्यात येणार असल्याचे संस्थेचे पुरुषोत्तम शिंदे यांनी सांगितले. त्यासाठी नागरिकांनी त्यांच्याकडे असलेली रद्दी न विकता ती थेट संस्थेने दिलेल्या ठिकाणी गोळा केली तर त्यातून गरिबांची दिवाळी साजरी होण्यास मदत होईल.

नागरिकांचा रद्दीच्या माध्यमातूनच गरिबांच्या चेहऱ्यावर आनंद फुलवण्यास हातभार लागेल. त्यामुळे प्रभात किड्स, दि. प्रभात बेकरी, हॉटेल सेंटर प्लाझा, चिंतामणी मेडिकल, उमरी, लोकमान्य वॉच, टिळक रोड, छाया मेडिकल, डाबकी रोड, अस्पायर इंग्लिश क्लासेस आदींपैकी कुठल्याही ठिकाणी वृत्तपत्राची रद्दी देऊन संस्थेच्या कार्यात मदत करावी, असे आवाहन पुरुषोत्तम शिंदे यांनी केले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 18, 2020 3:14 am

Web Title: money from old newspaper sales use for diwali celebration of poor purushottam shinde zws 70
Next Stories
1 पेण बँकेच्या विलिनीकरणासाठी पुन्हा प्रयत्न
2 रत्नागिरीत ८०० चाचण्यांमध्ये १८ करोनाबाधित
3 पीक विमा कंपनीकडून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना प्रतिसाद नाही
Just Now!
X