राहाता : तालुक्यातील राजुरी येथील एका विवाहसोहळ्यात वधू आणि वर बोहल्यावर उभे राहिले असता तेथे जमलेल्या वऱ्हाडी मंडळींनी जम्मू काश्मीर मधील पुलवामा येथे झालेल्या पाकिस्तानी दहशतवाद्यांच्या भ्याड हल्लय़ात शहीद झालेल्या भारतीय जवानांना श्रद्धांजली वाहून या आत्मघातकी हल्ल्याचा निषेध  केला.  या वेळी सदर विवाह सोहळ्यात सत्कार समारंभास फाटा देऊन सदर रक्कम शहीद जवानांच्या कुटुंबीयास व काही निधी शाळेस सुपूर्द करण्यात आला.

तालुक्यातील राजुरी येथील तलाठी कार्यालयातील कोतवाल अण्णासाहेब राधुजी कदम यांची कन्या माधुरी तसेच कोल्हार येथील मनोज गणपत सोनवणे यांचे चिरंजीव आशुतोष यांचा विवाह राजुरी येथील खडकवाडी येथे पार पडला. या वेळी अनेक मान्यवरांनी या हल्ल्याच्या घटनेचा निषेध करून दोन मिनिटे उभे राहून शहीद जवानांना मानवंदना दिली. या वेळी राजुरीचे सरपंच सुरेश कसाब, डॉ.सोमनाथ गोरे,काकासाहेब गोरे, भालेराव सर, शिवसेनेचे जिल्हा प्रमुख सोमनाथ गोरे, शेतकरी संघटनेचे बाळासाहेब भालेराव, माजी सरपंच प्रकाश गोरे, बापूसाहेब गोरे, तंटामुक्ती अध्यक्ष संजय गोरे, राहाता तालुका युवक काँग्रेस जनरल सेक्रेटरी रुपाली राहुल गोरे, मधुकर कदम, आर.डी.कदम, वैभव कदम, अण्णासाहेब गोरे, राहुल गोरे, अण्णासाहेब बेंद्रे, पत्रकार विजय बोडखे आदींसह ग्रामस्थ व वऱ्हाडी मंडळी मोठय़ा संख्येने उपस्थित होते.या प्रसंगी प्राचार्य, स्थानिक स्कूल कमिटी, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष, उपाध्यक्ष, सदस्य, विविध संस्थांचे पदाधिकारी, शिक्षक, विद्यार्थी, पालक व ग्रामस्थ मोठय़ा संख्येने उपस्थित होते.