काँग्रेसचे मंत्री आणि राज्याचे क्रीडामंत्री सुनील केदार यांच्या पत्नीच्या पर्समधून पैसे चोरण्याचा प्रयत्न मोलकरणीला चांगलाच अंगलट आला. पैसे काढून कपाटात लपवून ठेवताना अनुजा केदार यांनी मोलकरणीला रंगेहात पकडले व पोलिसांच्या ताब्यात दिले.

गीता इंगोलो असे या मलोकरणीचे नाव आहे. अनुजा सुनील केदार यांचे आई-वडील अंबाझरी पोलीस हद्दीतील लॉ कॉलेज चौक परिसरात राहतात. आई-वडिलांना भेटण्याकरिता रविवारी अनुजा माहेरी आल्या होत्या. त्यावेळी त्यांनी पर्स घरात ठेवली होती. घरकाम करणाऱ्या गीताने कुणाचे लक्ष नसताना त्यांच्या पर्समधून तीन हजार रुपयांची रोख रक्कम काढली व एका कपाटात लपवत असताना गीताला अनुजा यांनी रंगेहात पकडले. त्यानंतर पोलीस नियंत्रण कक्षाला माहिती देऊन अंबाझरी पोलिसांच्या ताब्यात दिले.