19 November 2019

News Flash

पावसाचं ठरलं! दोन ते तीन दिवसात कोसळणार

हवामान विभागाने वर्तवला अंदाज

संग्रहित छायाचित्र

मागच्या अनेक दिवसांपासून पावसाने हुल दिली होती. मात्र येत्या दोन ते तीन दिवसांमध्ये मान्सून दाखल होणार ही माहिती हवामान विभागाचे अधिकारी के. एस. होसाळीकर यांनी ट्विट करून दिली. रत्नागिरी, कोल्हापूर या ठिकाणी पावसाचे आगमन झालं आहे आणि त्यानंतर महाराष्ट्रात पाऊस पडण्यास सुरूवात होईल असे होसाळीकर यांनी स्पष्ट केले आहे. कोकणात आणि मध्य महाराष्ट्रात पावसाची एंट्री झाली आहे. येत्या दोन ते तीन दिवसात संपूर्ण महाराष्ट्रात मान्सून दाखल होईल असेही त्यांनी म्हटले आहे.

गेल्या अनेक दिवसांपासून मान्सूनची प्रतीक्षा मुंबईसह महाराष्ट्रात होते आहे. वायू वादळाच्या फटक्याने मान्सून लांबणीवर पडला. १२ ते १४ जूनच्या दरम्यान मान्सून दाखल होईल असा अंदाज वर्तवण्यात आला मात्र तोही खरा ठरला नाही. आता त्या वादळाचा धोकाही टळला आहे. त्यामुळे येत्या दोन ते तीन दिवसात मुंबईसह महाराष्ट्रात पाऊस पडण्यास सुरूवात होईल असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.

जूनच्या सुरूवातीलाच पाऊस पडतो आणि त्यानंतर हळूहळू सक्रिय होतो. मात्र यावेळी तसं झालं नाही. हवामान विभागाने दिलेल्या तारखांना पावसाने हुलकावणीच दिली. आता वायू वादळाचा धोका टळला आहे.त्यामुळे निदान येत्या दोन ते तीन दिवसात मान्सून सक्रिय होईल असा अंदाज नव्याने वर्तवण्यात आला आहे.

 

First Published on June 20, 2019 11:59 am

Web Title: monsoon onset declared in parts of south konkan and parts of south madhya maharashtra today says imd scj 81
Just Now!
X