News Flash

महाराष्ट्रात २७०० पेक्षा जास्त करोना रुग्णांना दिवसभरात डिस्चार्ज

महाराष्ट्रातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९३ टक्क्यांच्याही वर

संग्रहित छायाचित्र

महाराष्ट्रात २७७४ करोना रुग्ण बरे होऊन आज दिवसभरात घरी गेले आहेत. राज्यातील एकूण १७ लाख ४९ हजार ९७३ रुग्णांनी आत्तापर्यंत करोनावर मात केली आहे. यामुळे महाराष्ट्रातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण अर्थात रिकव्हरी रेट हा ९३.४६ टक्के झाला आहे. आज राज्यात ४ हजार २६८ करोना रुग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत. तर राज्यात आज ८७ मृत्यूंची नोंद झाली आहे. महाराष्ट्रातील मृत्यू दर सध्या २.५७ टक्के इतका आहे. महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागाने ही माहिती दिली आहे.

आजपर्यंत तपासण्यात आलेल्या १ कोटी १५ लाख ७० हजार १३७ नमुन्यांपैकी १८ लाख ७२ हजार ४४० नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ५ लाख ३२ हजार २८८ व्यक्ती होम क्वारंटाइन आहेत. तर ५ हजार १२२ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाइन आहेत. राज्यात आज घडीला ७३ हजार ३१५ अॅक्टिव्ह रुग्ण आहेत.

आज राज्यात ४ हजार २६८ नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. आता राज्यातील एकूण करोनाबाधितांची संख्या १८ लाख ७२ हजार ४४० इतकी झाली आहे. आज नोंद झालेल्या ८७ मृत्यूंपैकी ३८ मृत्यू हे मागील ४८ तासांमधले आहेत. तर २३ मृत्यू हे मागील आठवड्यातले आहेत. उर्वरित २६ मृत्यू हे एक आठवड्यापूर्वीपेक्षा कमी कालावधीतले आहेत अशीही माहिती आरोग्य विभागाने दिली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 11, 2020 8:01 pm

Web Title: more than 2700 corona patients discharged in a day in maharashtra scj 81
टॅग : Coronavirus
Next Stories
1 शेतकरी आंदोलन सुरुच रहावं अशी काहींची इच्छा-फडणवीस
2 शरद पवारांना प्रश्न विचारणाऱ्या खासदारांचा अभ्यास काय?-भुजबळ
3 शहापूर तालुक्यातील ११० पैकी ९६ ग्रामपंचायती ग्रीन झोनमध्ये
Just Now!
X