News Flash

महाराष्ट्रात आज आठ हजार ८०७ नव्या करोनाबाधितांची नोंद, ८० रुग्णांचा मृत्यू

काल मंगळवारी राज्यात इतक्या रुग्णांची नोंद झाली होती.

संग्रहीत

मुंबईसह महाराष्ट्रात दररोज करोनाबाधितांचा आकडा वाढतच चालला आहे. राज्य सरकारने करोनाची ही वाढ रोखण्यासाठी राज्याच्या अनेक भागात पुन्हा निर्बंध लागू केले आहेत. यात लॉकडाउन, संचारबंदी सारखे निर्णय घेतले आहेत. पण रुग्ण संख्या कमी होण्याऐवजी उलटी वाढतच आहे.

आज राज्यात आठ हजार ८०७ नव्या करोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. काल मंगळवारी ६ हजार २१८ नवे करोनाबाधितांची नोंद झाली होती. त्यातुलनेत आजचे प्रमाण जास्त आहे.

राज्यात आज करोनामुळे ८० रुग्णांचा मृत्यू झाला. सध्या महाराष्ट्रातील मृत्यूदर २.४५ टक्के एवढा आहे. त्याचवेळी रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९४.७० टक्के एवढे आहे. राज्यात सध्या २ लाख ९५ हजार ५७८ व्यक्ती होम क्वारंटाइन आहेत. २,४४६ जण संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये आहेत. राज्यात अजून ५९ हजार ३५८ अ‍ॅक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यात आज २ हजार ७७२ रुग्ण बरे होऊन घरी परतले. आतापर्यंत २० लाख ८ हजार ६२३ रुग्णांनी करोनावर मात केली आहे.

पुण्यात ७४३ करोनाबाधित
आज पुणे शहरात दिवसभरात 743 करोना बाधित रुग्ण आढळले. तीन करोना रुग्णांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला.
382 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहे. मंगळवारी पुण्यात दिवसभरात ६६१ नवे करोनाबाधित आढळले, तर चार रुग्णांचा मृत्यू झाला होता.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 24, 2021 7:54 pm

Web Title: more than eight thousand new covid patients found in maharashtra dmp 82
Next Stories
1 लंडनला २१ डझन हापूस निर्यात…मुहूर्ताच्या पहिल्या पेटीला ५१ पौंडचा विक्रमी दर
2 पालघरमधील नौदल अधिकाऱ्याच्या मृत्यू प्रकरणाला धक्कादायक वळण; पोलिसांनी दिली महत्वाची माहिती
3 Pooja Chavan Case : प्रवीण दरेकरांचे सरकारला १४ सवाल! म्हणाले, ‘जनतेलाही हवीत उत्तरं’!
Just Now!
X