मॉर्निंग बुलेटिन : पाच महत्त्वाच्या बातम्या

१. जम्मू-काश्मीर : कुलगाम, पुलवामा येथे सुरक्षा रक्षक आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक

जम्मू-काश्मीरमध्ये गेल्या काही दिवसांपासून दररोज सुरक्षा रक्षक आणि दहशतवादी यांच्यामध्ये चकमकीच्या घटना घडत आहेत. आज (मंगळवार) पहाटे येथील कुलगाम आणि पुलवामा जिल्ह्यात चकमक सुरु असल्याचे वृ्त्त आहे. वाचा सविस्तर..

२. संयम बाळगा, पंतप्रधानपदाची प्रतिष्ठा राखा, मनमोहनसिंग यांचा मोदींना सल्ला

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बिगर भाजपा शासित राज्यांच्या दौऱ्यादरम्यान संयम बाळगला पाहिजे. त्यांनी आपल्या आचरणाच्या माध्यमातून एक उदाहरण सर्वांसमोर ठेवले पाहिजे. त्यांची वर्तणूक पंतप्रधानपदाला अनुरुप असायला हवी, असा सल्ला माजी पंतप्रधान मनमोहनसिंग यांनी पंतप्रधान मोदींना दिला आहे. वाचा सविस्तर..

३. दहशतवादविरोधी लढ्यात भारताला मिळाली अमेरिकेची साथ; ट्रम्प यांचा जाहीर पाठींबा

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मुंबईवरील दहशतवादी हल्ल्याला १० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त दहशतवादाविरोधातील लढाईत भारतासोबत दृढ निश्चयाने उभे राहण्याची इच्छा पुन्हा एकदा व्यक्त केली आहे. वाचा सविस्तर..

४. गेल्या नऊ वर्षांत दिवसाला सरासरी एका शेतकऱ्याची आत्महत्या!

गेल्या नऊ वर्षांत मराठवाडय़ात नापिकी आणि कर्जबाजारीपणामुळे मृत्यू झालेल्या पात्र शेतकऱ्यांची संख्या ३७१२ एवढी आहे. हवामानातील मोठे बदल, त्यातून निर्माण होणाऱ्या दुष्काळ आणि गारपिटीसारख्या समस्या, शासनाची ध्येयधोरणे यामुळे वैतागलेल्या शेतकऱ्यांनी स्वत:ला संपवून घेतले. त्याची नऊ वर्षांची सरासरी काढली तर दिवसाला एक शेतकऱ्याची आत्महत्या अशी निघते. वाचा सविस्तर..

५. नासाच्या ‘इनसाइट’ यानाचे मंगळ ग्रहावर यशस्वी लँडिंग

नासाचे इनसाइट (इंटरिअर एक्सप्लोरेशन यूजिंग सिस्मिक इन्व्हेस्टिगेशन) यान मंगळ ग्रहावर उतरले आहे. सोमवार आणि मंगळवारच्या दरम्यान भारतीय प्रमाणवेळेनुसार रात्री १ वाजून २४ मिनिटांनी इनसाइट यान मंगळ ग्रहावर उतरले. वाचा सविस्तर..