मॉर्निंग बुलेटिन : पाच महत्त्वाच्या बातम्या

१. एअर इंडियाच्या विमानाची संरक्षक भिंतीला धडक, मुंबईत इमर्जन्सी लँडिंग

एअर इंडियाच्या विमानाने संरक्षक भिंतीला धडक दिली असून मोठी दुर्घटना टळली आहे. त्रिची विमानतळावर ही दुर्घटना घडली आहे. वाचा सविस्तर..

२. एके 47 आली कुठून? मोहन भागवतांवर मोक्काअंतर्गत कारवार्इ करा, प्रकाश आंबेडकरांची मागणी

राष्ट्रीय स्वसंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांच्यावर मोक्का कायद्यानुसार कारवाई करावी अशी मागणी भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकरांनी केली आहे. या देशाचा कायदा कोणालाही शस्त्र बाळगण्याची परवानगी देत नाही, मग संघाकडे एके 47 रायफल कशी आली, असा सवाल प्रकाश आंबेडकरांनी देवेंद्र फडणवीस सरकारला केला आहे. वाचा सविस्तर..

३. ठाणे जिल्ह्य़ावर पाणीकपातीचे संकट 

यंदा सरासरीइतका पाऊस पडून जुलै महिन्यातच धरणे तुडुंब भरली असली तरी मंजूर कोटय़ापेक्षा उचल अधिक असल्याने ऑक्टोबर महिन्यापासूनच ठाणे जिल्ह्य़ातील शहरांमध्ये पाणीकपात करावी लागणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. वाचा सविस्तर..

४. लोलीवाला इमारतीतील रहिवासी मृत्यूच्या दाढेत

एखादी जुनी इमारत कोसळल्यानंतर जागी होणारी म्हाडा नागपाडा येथील लोलीवाला इमारतही बहुधा पडण्याचीच वाट पाहत असल्याची भावना रहिवाशांची झाली आहे. १२५ वर्षे जुन्या इमारतीचा मागील काही भाग दोन दिवसांपूर्वी कोसळला आणि रहिवासी हादरले. वाचा सविस्तर..

५. ‘फेअरनेस क्रीम’च्या वापरावर निर्बंध?

रंग उजळविण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या ‘फेअरनेस’ क्रीमच्या वापरावर आता बंधने येणार आहेत. ‘हायड्रोक्विनोन’ घटक असलेल्या रंग उजळविण्यासाठीच्या क्रीमच्या अतिवापराने त्वचेवर दुष्परिणाम होत असल्याने प्रिस्क्रिप्शनशिवाय या क्रीमच्या विक्रीवर लवकरच बंदी येण्याची शक्यता आहे. वाचा सविस्तर..