मॉर्निंग बुलेटिन: पाच महत्त्वाच्या बातम्या

१. पेट्रोल-डिझेलनंतर आता एलपीजी, सीएनजी आणि एटीएफच्या दरातही वाढ

पेट्रोल-डिझेलच्या किंमतीमध्ये दररोज होत असलेल्या वाढीमुळे त्रस्त असलेल्या सामान्य व्यक्तीवर आता महागाईचा तिहेरी झटका बसला आहे. स्वयंपाकाच्या गॅस सिलिंडरबरोबर आता सीएनजीही महाग झाले आहे. वाचा सविस्तर..

२. ‘युतीसाठी आग्रह, पण शिवसेनेला निधी देण्यास टाळाटाळ’

शिवसेनेच्या आमदारांची कामे होत नसल्यामुळे तसेच पाच कोटींचा विकास निधी मिळावा यासाठी गेल्या वर्षी अधिवेशनकाळात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली सेना नेत्यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली होती. त्यावेळी विकास निधी देण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मान्य केले. त्याला आता वर्ष उलटले तरी अद्यापि सेनेच्या आमदारांना विकास निधी मिळालेला नाही. वाचा सविस्तर..

३. माझ्याबद्दल अपशब्द काढा पण सरदार पटेलांबाबत भाष्य नको, मोदींनी राहुल गांधींना फटकारले

गुजरात दौऱ्यावर असलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी आणि तत्कालीन यूपीए सरकारवर निशाणा साधला आहे. काही दिवसांपूर्वी राहुल गांधींनी स्टॅच्यू ऑफ यूनिटीवरुन केलेल्या टीकेला त्यांनी प्रत्युत्तर दिले आहे. वाचा सविस्तर..

४. लष्कराने गोळीबार केलेल्या हेलिकॉप्टरमध्ये होते पाकव्याप्त काश्मीरचे पंतप्रधान

जम्मू-काश्मीरच्या पूँछ सेक्टरमध्ये नियंत्रण रेषेजवळ रविवारी दुपारी हवाई हद्दीचे उल्लंघन करणाऱ्या एका पाकिस्तानी हेलिकॉप्टरवर भारतीय सैन्याकडून तात्काळ कारवाई करण्यात आली होती. भारतीय सैन्याने गोळीबार केलेल्या या हेलिकॉप्टरमध्ये पाकिस्तान व्याप्त काश्मीरचे पंतप्रधान राजा फारुख हैदर खान, पीओकेचे पर्यटन मंत्री मुश्ताक मिन्हास, शिक्षण मंत्री इफ्तिकार गिलानी अशी बडी नेते मंडळी असल्याची माहिती समोर आली आहे. वाचा सविस्तर..

५. ..तर जनतेच्या सहनशीलतेचा अंत होईल, उद्धव ठाकरेंचा भाजपा, निवडणूक आयोगाला इशारा

निवडणुकांवेळी देण्यात येणाऱ्या आश्वासनांवरुन शिवसेनेने पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज्य निवडणूक आयोगावर निशाणा साधला आहे. निवडणुकांतील आश्वासने पूर्ण न केल्यास गुन्हा दाखल करण्यात येईल, अशी भूमिका राज्य निवडणूक आयुक्त सहारिया यांनी जाहीर केली होती. त्यांच्या या वाक्याचा शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी चांगलाच समाचार घेतला आहे. वाचा सविस्तर..