मॉर्निंग बुलेटिन : पाच महत्त्वाच्या बातम्या

१. ‘बधाई हो’, पेट्रोल-डिझेल स्वस्त; जाणून घ्या आजचे दर

vasai leopart marathi news, vasai fort leopard marathi news
वसई : बिबट्याच्या दहशतीचा परिणाम, रोरोच्या संध्याकाळच्या शेवटच्या दोन फेऱ्या रद्द
bombay share market, sesex, nifty
भू-राजकीय तणाव वाढण्याच्या भीतीने ‘सेन्सेक्स’ची ४५६ अंश गाळण
will Andheri Subway under water this year too work of widening of Mogra drain will be done next year
‘अंधेरी सबवे’ यंदाही पाण्याखाली? मोगरा नाल्याच्या रुंदीकरणाचे काम पुढच्या वर्षीच
ie think our cities
IE THINC Second Edition: “लवकरच असमानता आणि हवामान बदल ही आपल्या शहरांसमोरची सर्वात मोठी आव्हानं ठरतील!”

दसऱ्याच्या दिवशी आनंददायक बातमी आहे. आज पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कपात करण्याचा निर्णय तेल कंपन्यांनी घेतला आहे. वाचा सविस्तर..

२. पुणे: देशात पहिल्यांदाच गर्भ प्रत्यारोपणातून कन्येचा जन्म

गर्भाशय प्रत्यारोपणानंतर पहिल्यांदाच एका महिलेची प्रसूती झाल्याची ऐतिहासिक घटना गुरुवारी रात्री पुण्यात घडली. गर्भाशय प्रत्यारोपणानंतर देशात पहिल्यांदाच एका महिलेने गोंडस चिमुकलीला जन्म दिला. वाचा सविस्तर..

३. शिवसेनेचा आज कट्टर हिंदुत्वाचा नारा; राम मंदिरासाठी मोदींवर ‘हल्लाबोल’

भाजप-शिवसेनेत जोरदार खणाखणी सुरू असताना शिवसेनेचा दसरा मेळावा दादर येथील शिवाजी पार्कवर गुरूवारी होत असून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडून केंद्र व राज्य सरकारवर तोफा डागल्या जाण्याची शक्यता आहे. वाचा सविस्तर..

४. शबरीमाला प्रवेश वाद : तणाव कायम, परिसरात जमावबंदी लागू

महिला प्रवेशाच्या पार्श्वभूमीवर केरळच्या शबरीमाला मंदिर परिसरात सध्या तणावाचे वातावरण सुरु आहे. त्यासाठी परिसरात मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्तही ठेवण्यात आला आहे. वाचा सविस्तर..

५. पंकजा मुंडेंचं भगवानगडावर आज राजकीय शक्तीप्रदर्शन

आधी भगवानगड… त्यानतंर गोपीनाथ गड आणि आता सावरगाव…ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडेंच्या राजकारणाचं नव शक्तीस्थान असणार आहे. पंकजा मुंडे यांनी भगवानगडावरील संघर्षांनंतर गेल्या वर्षी सावरगाव घाट(ता.पाटोदा) येथे स्थलांतरीत केलेल्या ‘दसरा’ मेळाव्याला यावेळी कसा प्रतिसाद मिळतो याची साऱ्यांनाच उत्सुकता आहे. वाचा सविस्तर..