मॉर्निंग बुलेटिन : पाच महत्त्वाच्या बातम्या

१. …तर हनुमानजी करतील भाजपाच्या लंकेचं दहन!

गेल्या काही दिवसांपासून हनुमानाच्या जाती आणि धर्मावरून विविध चर्चांना उधाण आलं आहे. यावर आता काँग्रेस नेते आणि उत्तर प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष राज बब्बर यांनी भाजपावर निशाणा साधला आहे. वाचा सविस्तर..

२. सुमित वाघमारे हत्या : मुख्य आरोपी बालाजी लांडगे आणि संकेत वाघला अटक

बीडमधील सुमित वाघमारे हत्या प्रकरणात पोलिसांनी मुख्य आरोपींना अटक केली आहे. भररस्त्यात निर्घृणपणे खून करणाऱ्या बालाजी लांडगे आणि संकेत वाघ या दोघांना पाच दिवसांनंतर पोलिसांनी अकोला परिसरातून अटक केल्याचं समजतंय. वाचा सविस्तर..

३. कर्मचाऱ्यांनी सार्वजनिक ठिकाणी नमाज पठण केले तर कंपन्या जबाबदार – नोएडा पोलीस

उत्तर प्रदेश पोलिसांच्या एका आदेशामुळे नोएडा औद्योगिक केंद्रातील कंपन्यांची चिंता वाढली आहे. मुस्लिम कर्मचाऱ्यांनी सार्वजनिक ठिकाणी नमाज पठण केले तर त्यासाठी कंपन्यांना जबाबदार धरण्यात येईल असे नोएडा पोलिसांनी आपल्या आदेशात म्हटले आहे. वाचा सविस्तर..

४. हिट अँड रन प्रकरण : आरोपीचं परदेशात हनिमूनला जाण्याचं स्वप्न भंगलं

लग्नानंतर परदेशात हनिमूनला जाण्याची स्वप्ने रंगवणाऱ्या विस्मय शाहला गुजरात उच्च न्यायालयाने झटका दिला आहे. वाचा सविस्तर..

५. ठाणे: पाचपाखाडी परिसरात अज्ञातांनी 18 दुचाकी जाळल्या

ठाण्यात दुचाकी जाळण्याचं सत्र सुरूच असून पाचपाखाडी परिसरात अज्ञातांनी 18 दुचाकी जाळल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. वाचा सविस्तर..