मॉर्निंग बुलेटिन: पाच महत्त्वाच्या बातम्या

१. सानिया मिर्झा-शोएब मलिक झाले आई-बाबा!

भारताची आघाडीची टेनिसपटू सानिया मिर्झा आणि तिचा पती शोएब मलिक यांच्या घरी नव्या पाहुण्याचे आगमन झाले आहे. सानियाने मंगळवारी पहाटे गोंडस मुलाला जन्म दिला आहे. वाचा सविस्तर..

२. पेट्रोल आणि डिझेल दरांमध्ये पुन्हा घट

पेट्रोल आणि डिझेल या दोन्ही दरांमध्ये पुन्हा एकदा घट झाली आहे. पेट्रोल २० पैसे प्रति लिटर तर डिझेल ८ पैसे प्रति लिटर स्वस्त झाले आहे. वाचा सविस्तर..

३. बेकायदा फलकबाजीत सत्ताधारीच आघाडीवर

गेल्या दोन वर्षांत बेकायदा फलकबाजी करण्यात सत्ताधारी शिवसेना आणि भाजप युतीच आघाडीवर असल्याची बाब महापालिकांनी प्रतिज्ञापत्राद्वारे दिलेल्या माहितीतून उघड झाली आहे. दोन्ही पक्षांनी बेकायदा फलकबाजी करणार नाही, असे हमीपत्र न्यायालयास दिले होते. वाचा सविस्तर..

४. कंत्राटदारांसाठी राज्यावर कर्जाचा डोंगर

‘ही कसली प्रगती, ही तर अधोगती’ ही पुस्तिका काढून राष्ट्रवादी काँग्रेसने राज्यातील भाजप-शिवसेना युती सरकारच्या चार वर्षांच्या कारभाराचा पंचनामा केला आहे. वाचा सविस्तर..

५. मराठी संगीत विश्वातील ‘देव’ हरपला, यशवंत देव यांचे निधन

मराठी संगीत विश्वावर आधिराज्य गाजवणारे ज्येष्ठ संगीतकार, गीतकार यशवंत देव यांचे रात्री दीड वाजता वयाच्या ९१ व्या वर्षी दीर्घ आजाराने निधन झाले. गेल्या काही दिवसांपासून ते आजारी होते. वाचा सविस्तर..