मॉर्निंग बुलेटिन : पाच महत्त्वाच्या बातम्या

१. Madhya Pradesh Assembly Election 2018 Result Live: मध्य प्रदेशमध्ये काँग्रेस आघाडीवर

मध्य प्रदेश विधानसभा निवडणुकीतील मतमोजणीला सकाळी सुरुवात झाली असून सुरुवातीचे कल पाहता ही लढत अटीतटीची होण्याची चिन्हे आहेत. मध्य प्रदेशमधील २३० जागांपैकी ६० जागांवर सध्या भाजपा तर काँग्रेस ५१ आघाडीवर आहे. वाचा सविस्तर..

२. Chhattisgarh Election Results 2018 LIVE Updates: भाजपाला हादरा ?, काँग्रेसची आघाडी

छत्तीसगडमध्ये भाजपाला हादरा बसण्याची चिन्हे आहेत. ९० जागा असलेल्या छत्तीसगडध्ये काँग्रेस ४० तर भाजपा ३० जागांवर आघाडीवर आहे. वाचा सविस्तर..

३. Rajasthan Election 2018 Live Updates: पोस्टल मतमोजणीत काँग्रेस आघाडीवर

राजस्थानमध्ये १९९ जागांसाठी मतमोजणी होणार असून बहुमतासाठी १०० जागांची आवश्यकता आहे. वाचा सविस्तर..

४. उर्जित पटेलांचा राजीनामा देशाच्या अर्थव्यवस्थेला जबर धक्का : मनमोहन सिंग</strong>

भारतीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर उर्जित पटेल यांच्या राजीनाम्यानंतर भारताच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. उर्जित पटेल यांच्या राजीनाम्यावरुन सर्वच विरोधकांनी केंद्रातील भाजपा सरकारला लक्ष्य केलं असताना माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनीही आपली प्रतिक्रिया दिली आहे. वाचा सविस्तर..

५. यमुना नदीत महाराष्ट्रातील भाविकांची बोट उलटली, 3 महिलांचा मृत्यू; 5 बेपत्ता

उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथे मनकामेश्वर मंदिराजवळील यमुना नदीत बोट उलटल्याने 3 महिलांचा मृत्यू झाला, तर पाच जण बेपत्ता झालेत. सहा जणांना वाचवण्यात यश आलं आहे. वाचा सविस्तर..