मॉर्निंग बुलेटिन : पाच महत्त्वाच्या बातम्या

१. तृप्ती देसाई केरळमध्ये दाखल होणार, विमानतळाबाहेर विरोधकांची गर्दी

शबरीमला मंदिरात प्रवेशासाठी भुमाता ब्रिगेडच्या प्रमुख तृप्ती देसाई या केरळकडे रवाना झाल्या आहेत. मात्र, येथील विमानतळावर आगमन होताच मोठ्या विरोधाला त्यांना सामोरे जाऊ लागू शकते. कारण, विमानतळाबाहेर विरोधकांनी गर्दी केली आहे. त्यामुळे त्या मंदिरापर्यंत पोहोचू शकतील का? याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे. वाचा सविस्तर..

२. मराठा आरक्षण कायद्याच्या कचाटय़ात?

ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता स्वतंत्र संवर्ग करून मराठा समाजाला आरक्षण देण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केले असले तरी आरक्षणाची टक्केवारी ५० टक्क्यांहून अधिक होणार असल्याने तो सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचा भंग होणार आहे. त्यामुळे मराठा आरक्षण कायदेशीर कचाटय़ात अडकण्याची भीती आहे. वाचा सविस्तर..

३. अशोक चव्हाण विधानसभेच्या रिंगणात उतरणार ?

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या वतीने लोकसभा निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेण्यास सुरुवात करण्यात आली आहे. गुरुवारी मराठवाडा व पश्चिम महाराष्ट्रातील लोकसभा मतदारसंघातील राजकीय स्थिती आणि पक्षाचे संभाव्य उमेदवार यावर चर्चा करण्यात आली. या वेळी प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी लोकसभेची निवडणूक न लढविता नांदेड जिल्ह्य़ातून विधानसभेची निवडणूक लढवावी, असा आग्रह कार्यकर्त्यांकडून करण्यात आला. वाचा सविस्तर..

४. #MeToo: ‘भाजपा नेता मला अश्लील छायाचित्र पाठवायचा’

उत्तराखंडमधील भाजपा नेते संजय कुमार यांना लैंगिक शोषणाच्या आरोपामुळे पदावरुन हटवण्यात आल्यानंतर पीडित महिलेने संपूर्ण प्रकरणावर प्रतिक्रिया दिली आहे. वाचा सविस्तर..

५. थेरेसा मे अडचणीत

युरोपीय समुदायातून बाहेर पडण्यास ब्रिटनच्या नागरिकांनी सार्वमतातून बहुमताने कौल दिला असला, तरी ‘ब्रेग्झिट’ म्हणजे या प्रत्यक्ष माघारीसाठी युरोपीय समुदायाबरोबर होत असलेल्या करारातील अनेक तरतुदी आणि अटींवरून पंतप्रधान थेरेसा मे यांच्या विरोधात त्यांच्याच मंत्रिमंडळातील काही सहकाऱ्यांनी राजीनामे द्यायला सुरुवात केल्याने मे या अडचणीत आल्या आहेत. वाचा सविस्तर..