मॉर्निंग बुलेटिन : पाच महत्त्वाच्या बातम्या

१. पुतळ्याचे लॉलीपॉप दाखवणाऱ्यांपासून हिंदूंनी सावध राहावे: शिवसेना

इंडोनेशिया, मॉरिशससारख्या देशांत, नेपाळात राममंदिरे भव्य मूर्तीसह उभी राहत आहे. आता रामाची एक मोठी पुतळावजा मूर्ती उभी करून तुम्ही कोणत्या झाडाची पाने हिंदूंच्या तोंडास पुसत आहात, असा सवाल शिवसेनेने भाजपाला विचारला आहे. वाचा सविस्तर..

२. दहशतवादी कारवायांची योजना आखणाऱ्या दोघांना नागपुरात अटक

उपराजधानीत दहशतवादी कारवायांची योजना आखणाऱ्या दोघांना लष्करी गुप्तचर यंत्रणेने (मिलिटरी इंटेलिजन्स) शुक्रवारी रात्री ताब्यात घेतले. या घटनेने पुन्हा एकदा नागपूर चर्चेत आले आहे. वाचा सविस्तर..

३. पेट्रोल व डिझेल १७ पैशांनी स्वस्त, जाणून घ्या राज्यातील प्रमुख शहरांमधील दर

वाढलेला पुरवठा आणि आर्थिक मंदीपायी घटलेल्या मागणीमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत खनिज तेलाच्या किंमतीत घट झाल्याने भारतातील पेट्रोल व डिझेलच्या दरातही कपात सुरूच आहे. शनिवारी मुंबईत पेट्रोल व डिझेल प्रति लिटर १७ पैशांनी स्वस्त झाले आहे. वाचा सविस्तर..

४. ‘टी १’ वाघिणीला नाईलाजाने मारावे लागले

‘टी १’ वाघीण नरभक्षक झाल्याने तिला नाईलाजाने मारावे लागले. यात वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचा काहीही दोष नाही. या मुद्यांवरून त्यांच्या राजीनाम्याची मागणी करणे चुकीचे आहे, अशा शब्दात केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी मुनगंटीवार यांची भक्कम पाठराखण केली. वाचा सविस्तर..

५. रक्तपाताविना सरकारला प्रश्नांची निकड कळत नाही – राजू शेट्टी</strong>

सरकारमध्ये चोर, दरोडेखोर असून राज्यमंत्री सदाभाऊ खोत हा माझा प्रतिस्पर्धीच होऊ शकत नसल्याचे प्रतिपादन खा. राजू शेट्टी यांनी बुधवारी पत्रकार बैठकीत केले. या सरकारला रक्तपात झाल्याविना प्रश्नांची निकड कळत नसल्याचेही त्यांनी सांगितले. वाचा सविस्तर..