मॉर्निंग बुलेटिन : पाच महत्त्वाच्या बातम्या

१. पेट्रोल-डिझेल स्वस्त; नागरिकांना तात्पुरता दिलासा

पेट्रोल आणि डिझेलच्या दरात आजही घट झाली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात इंधनाच्या दरात घसरण झाल्याने नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला आहे. मात्र, गेल्या सुमारे आठवडाभरापासून पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत घसरण होत असल्याने लोकांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. वाचा सविस्तर..

२. राफेल करार हा ‘बोफोर्स’ घोटाळ्याचा बाप: शिवसेना</strong>

राफेल करारासंदर्भात सुप्रीम कोर्टात सुरु असलेल्या सुनावणीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेने मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. वाचा सविस्तर..

३. राज्यातील आरक्षण आता ६८ टक्के!

मराठा समाजाला मागास प्रवर्गात समाविष्ट करत सरसकट १६ टक्के आरक्षण देण्याची शिफारस राज्य मागासवर्ग आयोगाने केली असल्याचे समजते. याबाबतचा अहवाल गुरुवारी राज्य सरकारला सादर करण्यात येणार आहे. वाचा सविस्तर..

४. श्री रामायण एक्स्प्रेसला हिरवा कंदील; १६ दिवसांत ऐतिहासिक प्रवास अनुभवण्याची संधी

देशात सध्या निवडणुकांचे वारे वेगाने वाहण्यास आता सुरुवात झाली आहे. त्यात राम मंदिर हा मुद्दा ऐरणीवर आला आहे. त्याचाच एक भाग म्हणून बुधवारी श्री रामायण एक्स्प्रेसला बुधवारपासून सुरुवात झाली. वाचा सविस्तर..

५. नेटफ्लिक्स, अॅमेझॉन प्राइमसाठी सेन्सॉरशिप?, हायकोर्टाने मागवले केंद्राचे मत

 

नेटफ्लिक्स, अॅमेझॉन प्राइम, हॉटस्टारवरील वेबसिरीज आणि चित्रपटांमधील अश्लीलता, हिंसकता व अभद्र संवादांविरोधात दिल्ली हायकोर्टात जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे. या याचिकेवर दिल्ली हायकोर्टाने केंद्र सरकारला नोटीस बजावली आहे. वाचा सविस्तर..