मॉर्निंग बुलेटिन : पाच महत्त्वाच्या बातम्या

१. मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत

शहाड – कल्याण स्थानकादरम्यान रुळाला तडे गेल्याने मध्य रेल्वेची वाहतूक मंगळवारी सकाळी विस्कळीत झाली. मुंबईकडे येणाऱ्या मेल- एक्स्प्रेस तसेच लोकल गाड्यांचा खोळंबा झाला असून ऐन गर्दीच्या वेळी हा प्रकार घडल्याने प्रवाशांना मनस्तापाचा सामना करावा लागला. वाचा सविस्तर..

२. राष्ट्रीय आपत्ती म्हणून भाजपला हद्दपार करा!

दुष्काळावर चर्चा सुरु असताना भाजप राम मंदिराचा मुद्दा काढून समाजात दुषित वातावारण तयार करण्याचा प्रयत्न करीत आहे, घटनात्मक संस्थांवर हल्ले करुन त्या दुबळ्या करणाऱ्या भाजपला राष्ट्रीय आपत्ती म्हणून सत्तेतून हद्दपार करुया, अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी नरेंद्र मोदी सरकावर हल्लाबोल केला. वाचा सविस्तर..

३. पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत आणखी घट; पहा…आजचे दर

पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत आजही घट झाली आहे. पेट्रोलच्या दरात ०.१३ पैशांनी तर ०.१२ पैशांनी डिझेलच्या दरात कपात झाली आहे. वाचा सविस्तर..

४. ‘राहुल गांधींच्या पूर्वजांनाही संघाच्या शाखा बंद करणं जमलं नाही’

मध्य प्रदेशमध्ये सरकारी कार्यालयात भरणाऱ्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शाखा बंद करण्याचे आश्वासन काँग्रेसने निवडणूक जाहीरनाम्यात दिल्यानंतर आता राजकीय पडसाद उमटण्यास सुरुवात झाली आहे. भाजपाचे नेते अनुराग ठाकूर यांनी यावरुन नेहरु-गांधी कुटुंबीयांवर टीका केली आहे. वाचा सविस्तर..

५. स्पायडर मॅन, हल्क या सुपरहिरोच्या पात्रांची निर्मिती करणारे स्टेन ली यांचे निधन