मॉर्निंग बुलेटिन : पाच महत्त्वाच्या बातम्या

1. माजी संरक्षण मंत्री जॉर्ज फर्नांडिस यांचे निधन

देशाचे माजी संरक्षणमंत्री जॉर्ज फर्नांडिस यांचे मंगळवारी सकाळी दिल्लीत निधन झाले. ते ८८ वर्षांचे होते. वाचा सविस्तर..

2. ‘अनुदान बळीराजाच्या पदरात पाडा, अन्यथा शेतकरी काय करेल याचा ‘दाखला’ गडकरींनी दिला आहे’

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना अनुदान देण्याचा निर्णय घेऊन राज्य सरकारने पहिले पाऊल टाकले हे चांगलेच आहे, पण हे अनुदान बळीराजाच्या पदरात वेळेत पडायला हवे. तसे झाले नाही तर शेतकरी काय करेल याचा ‘दाखला’ आम्ही नव्हे तर तुमच्याच नितीन गडकरींनी देऊन ठेवला आहे. तो तेवढा लक्षात ठेवा अशी आठवण शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी सामना संपादकीयच्या माध्यमातून भाजपाला करुन दिली आहे. वाचा सविस्तर..

3. ‘तुमचं तुमच्या मुलांवर प्रेम असेल तर मोदींना नव्हे ‘आप’ला मतदान करा’

आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी पालकांना ‘देशभक्ती’ आणि ‘मोदीभक्ती’ या दोन्हीपैकी एक पर्याय निवडण्याचे आवाहन केले आहे. वाचा सविस्तर..

4. भाजपा लाचार पक्ष नाही, युतीसाठी याचना करणार नाही-मुख्यमंत्री

महाराष्ट्रात आम्हीच मोठा भाऊ आहोत, असे शिवसेनेने भाजपाला बजावले आहे. मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेला थेट खडसावलंच आहे. वाचा सविस्तर..

5. ठाण्यात आयपीएल सराव?

ठाण्यातील दादोजी कोंडदेव स्टेडियमवर रणजी क्रिकेटचे नियमित सामने भरण्यास अद्याप अवकाश असला, तरी यंदाच्या मोसमात ठाणेकरांना या मैदानात आयपीएलच्या संघातील खेळाडू सराव करताना पाहता येऊ शकतील. वाचा सविस्तर..