22 April 2019

News Flash

मॉर्निंग बुलेटिन : पाच महत्त्वाच्या बातम्या

सामनाच्या अग्रलेखातून भाजपा आणि मुख्यमंत्री फडणवीस यांच्यावर सडकून टीका आणि वाचा इतर महत्त्वाच्या बातम्या..

मॉर्निंग बुलेटिन : पाच महत्त्वाच्या बातम्या

1.भाजपाने २०१४ साली पापाची बीजे रोवल्यामुळे युती लटकलेल्या अवस्थेत – उद्धव ठाकरे

शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आजच्या सामनाच्या अग्रलेखातून भाजपा आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर सडकून टीका केली आहे. वाचा सविस्तर..

2.वरातीच्या नाचण्यामुळे पूल कोसळला, नवरदेव पडला नाल्यात

लग्नाच्या वरातीत नाचगाणे सुरु असताना अचानक पूल कोसळल्यामुळे नवरदेवासह १५ जण नाल्यात पडले. वाचा सविस्तर..

3.राम मंदिरासाठी पुन्हा भाजपलाच निवडून द्या – सुब्रमण्यम स्वामी

आधुनिक भारतासाठी प्राचीन संस्कृतीचा सन्मान करणे आवश्यक आहे. अन्यथा कितीही विकास केला तरी देश पुन्हा परक्यांचा गुलाम होऊ शकतो असे स्पष्ट प्रतिपादन डॉ. सुब्रमण्यम स्वामी यांनी येथे केले. वाचा सविस्तर..

4.संघच देशाचे चित्र बदलू शकतो

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि संघाची विचारधाराच देशाचे चित्र बदलू शकते, असे ठाम मत केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी रविवारी व्यक्त केले. वाचा सविस्तर..

5.विश्वचषकासाठी भारत, इंग्लंड दावेदार -पाँटिंग

सद्य:परिस्थितीत भारत आणि इंग्लंड हे दोनच संघ एकदिवसीय विश्वचषकाच्या विजेतेपदासाठी प्रबळ दावेदार असल्याचे मत ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पाँटिंग याने व्यक्त केले. वाचा सविस्तर..

First Published on February 11, 2019 9:12 am

Web Title: morning bulletin important news uddhav thackeray ram temple and other news