मॉर्निंग बुलेटिन : पाच महत्त्वाच्या बातम्या

1.भाजपाला हादरा, अरुणाचल प्रदेशमधील ८ आमदारांचा पक्षाला रामराम

लोकसभा निवडणुकीपूर्वी अरुणाचल प्रदेशमध्ये भाजपाला हादरा बसला असून पक्षातील ८ आमदारांनी नॅशनल पीपल्स पार्टीत (एनपीपी) प्रवेश केला आहे. वाचा सविस्तर..

2.गोव्यात मनोहर पर्रिकर यांच्या पार्थिवाच्या साक्षीने ‘रात्रीस खेळ चाले’ सुरु होते : शिवसेना

गोव्यातील राजकारणावरुन शिवसेनेने भाजपावर निशाणा साधला आहे. ‘रात्रीस खेळ चाले’ या राजकीय मालिकेचे चित्रीकरण मनोहर पर्रिकर यांच्या पार्थिवाच्या साक्षीने सुरू होते. चिता पेटत होती व सत्तातूर भुते सत्तेसाठी एकमेकांच्या मानगुटीवर बसत होती, अशा शब्दात शिवसेनेने गोव्यातील घडामोडींवर नाराजी व्यक्त केली आहे. वाचा सविस्तर..

3. लोकसभा निवडणुकीनंतर नाईक शिवसेनेत?

लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीली प्रत्येक जागा महत्त्वाची असताना ठाणे लोकसभा मतदार संघात उभे राहण्याची पक्षश्रेष्ठींनी घातलेली गळ धुडकावल्याने माजी मंत्री गणेश नाईक व पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्या मध्ये एक दरी निर्माण झाली आहे. वाचा सविस्तर..

4.शरद पवार संभ्रमावस्थेत – फडणवीस

पुलवामा हल्ल्यानंतर भारताने केलेल्या हवाई हल्ल्याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केलेली विधाने पाहता ते संभ्रमावस्थेत सापडल्याचे दिसते, असा खोचक टोला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी लगावला. वाचा सविस्तर..

5. वडापाव १५, बिर्याणी थाळी २०५ रुपये; निवडणूक आयोगाचे महागडे दरपत्रक

केंद्रीय निवडणूक आयोगाने लोकसभा निवडणूक लढवणाऱ्या उमेदवाराला खर्चाची मर्यादा ७० लाख रुपये ठरवली आहे. मात्र, निवडणूक यंत्रणेने उमेदवारांसाठी जारी केलेल्या दरपत्रकातील खाद्यपदार्थाचे दर हे बाजाराभावापेक्षा अधिक आहेत. वाचा सविस्तर..