News Flash

मॉर्निंग बुलेटिन : पाच महत्त्वाच्या बातम्या

दिवसभरातील महत्वाच्या बातम्या एका क्लिकवर

मॉर्निंग बुलेटिन : पाच महत्त्वाच्या बातम्या, top 5

१.‘भाईजान’ या सांकेतिक नावाने सूत्रधाराचा आरोपींशी संवाद
अंधश्रद्धा निर्मुलन समितीचे अध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येसाठीची तयारी सुरू असताना डॉ. विरेंद्र तावडे अन्य आरोपींसोबत ‘भाईजान’ या सांकेतिक नावाने संवाद साधत होता. कटात सहभागी असलेल्या अन्य आरोपींनाही अशीच सांकेतिक नावे देण्यात आली होती. तसेच हे आरोपी सातत्याने डॉ. तावडेसोबत मोबाईलवरून संपर्कात होते, अशी माहिती केंद्रीय अन्वेषण विभागाच्या चौकशीतून पुढे आली आहे. वाचा सविस्तर

२. दाउदच्या मुलानंतर आता छोटा शकीलचा मुलगाही अध्यात्माच्या वाटेवर
कुख्यात अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा मुलगा मौलाना झाल्यानंतर आता दाउदचा खास हस्तक मानला जाणाऱ्या छोटा शकीलचा मुलगाही अध्यात्माच्या वाटेवर निघाल्याचं वृत्त समोर आलं आहे. बाप “गुन्हाओके देवता” तर मुले मात्र “अल्लाह के बंदे” असं परस्परविरोधी चित्र दिसत असल्याने आता दाउद आणि छोटा शकील नंतर त्यांची गादी कोण चालवणार? मुंबईच्या आणि विदेशातील बेकायदेशीर उद्योगांचा धनी कोण? असा प्रश्न दाउद आणि छोटा शकील यांच्यासमोर उभा राहिला आहे. वाचा सविस्तर

३. रुपयाच्या मूल्यातील पडझडीपेक्षा व्यापार तूट अधिक चिंताजनक – निती आयोग
रुपयाचे विनिमय मूल्यात सशक्तेचे काही फायदे जरूर आहेत, परंतु त्या घटकांना फारसे मनावर न घेतलेले बरे, असे कुमार यांनी स्पष्ट केले. अमेरिकी डॉलरच्या तुलनेत रुपयाचे विनिमय मूल्य इतिहासात प्रथमच सत्तरपल्याड म्हणजे ७०.३२ रुपये पातळीवर १६ ऑगस्ट रोजी गडगडले. चालू वर्षांत रुपयाचे मूल्य जवळपास १० टक्क्य़ांनी घरंगळले आहे. वाचा सविस्तर 

४. सेनेचे मंत्रीच कार्यकर्त्यांची कामे करीत नाहीत
गुरुवारी नागपुरात शिवसेनेचा मेळावा झाला. संपर्क प्रमुख खासदार गजानन कीर्तीकर यावेळी उपस्थित होते. या मेळाव्यात बोलताना आमदार धानोरकर यांनी शिवसेना मंत्र्यांचेच वाभाडे काढले. शिवसेनेचे विदर्भात संघटन नाही हे माहिती असताना सुद्धा पक्षाचा एकही मंत्री या भागाकडे लक्ष देत नाही. मग पक्ष कसा वाढेल, असा सवाल त्यांनी केला. शिवसेनेचे मंत्री शिवसैनिकांचीच कामे करीत नाहीत. त्यामुळे सत्ता असूनही सेना विदर्भात माघारली आहे. वाचा सविस्तर 

५. 63 टक्के भारतीय ऑफिसच्या वेळेत सर्च करत असतात फिरायची ठिकाणं
फिरस्तीसाठी निघालेल्या अनेकांच्या गर्दीत भारतीय अग्रस्थानी आहेत. मुळात भारतीयांना फिरायला खूप आवडतं आणि त्यासाठी ते नेहमीच वेगवेगळी ठिकाणे शोधत असतात. गुगलवर जाऊन नवनवीन ठिकाणांचा शोध घेणे हे तर प्रत्येकाचं आवडीचं काम असतं. नुकतंच एका सर्व्हेत ६३ टक्के लोक हे काम ऑफिसमध्ये असताना करत असल्याचं समोर आलं आहे. सर्व्हेनुसार, लंच झाल्यानंतर हे प्रमाण जास्त असतं. वाचा सविस्तर 

राज्य-देश-विदेश आणि मनोरंजन क्षेत्रातील महत्वाच्या बातम्यांसह दिवसभरातील सर्व बातम्यांचे अपडेट्स तुम्ही लोकसत्ता.कॉमवर वाचू शकणार आहात. क्लिक करा

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 25, 2018 9:49 am

Web Title: morning bulletin top 5 news of the day shivsena indian rupee
Next Stories
1 अटल बिहारी वाजपेयी शस्त्रपूजक होते : गृहराज्यमंत्री अहिर
2 बंगले पाडण्याची पर्यावरण मंत्रालयाची आणखी एक घोषणा
3 धुळ्यातील निवडणुकीत भाजपची धुरा गिरीश महाजनांकडे
Just Now!
X