X

मॉर्निंग बुलेटिन : पाच महत्त्वाच्या बातम्या

मुंबई – पुणे एक्स्प्रेस-वे वर वाहतूक कोंडी, मोदींवरील लघुपट शाळांमध्ये दाखवण्याचा फतवा आणि इतर महत्वाच्या बातम्या

मॉर्निंग बुलेटिन : पाच महत्त्वाच्या बातम्या

१. गणपती सुट्ट्यांमुळे मुंबई-पुणे एक्स्प्रेस-वे वर वाहतूक कोंडी

मुंबई – पुणे एक्स्प्रेस-वे वर वाहतूक कोंडी झाली आहे. बोरघाटात अमृतांजन पुलाजवळ वाहतूक कोंडी झाल्याने वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. पुण्याच्या दिशेने जाणाऱ्या मार्गावरील वाहतूक अत्यंत धीम्या गतीने सुरु आहे. वाचा सविस्तर..

२. महागाई वाढणार? डॉलरसमोर रुपयाची घसरण सुरूच

डॉलरच्या तुलनेत रुपयाची निच्चांकी घसरण सुरूच आहे. मंगळवारी अमेरिकी डॉलरच्या तुलनेत रुपया 29 पैशांनी घसरला. परिणामी एका डॉलरसाठी तब्बल 72 रुपये 74 पैसे मोजण्याची वेळ आली. वाचा सविस्तर..

३. मोदींवरील लघुपट शाळांमध्ये दाखवण्याचा फतवा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जीवनावरील ‘चलो जीते हैं’ हा लघुपट दाखवण्याचा नवा फतवा महाराष्ट्रातील शाळांसाठी काढण्यात आला आहे. हा लघुपट विद्यार्थ्यांना दाखवण्यास काही राज्यांनी नकार दिल्यानंतर वादंग उसळला होता. वाचा सविस्तर..

४. इंधनाचा भडका उडाला म्हणून आंतरराष्ट्रीय भाषा आणि एरवी ‘मन की बात’ हे बरोबर नाही – उद्धव ठाकरे

जागतिक घडामोडींचा हवाला देत इंधन दरवाढ कमी करण्याच्या जबाबदारीतून सत्ताधाऱ्यांनी अंग काढून घेऊ नये. इंधनाचा भडका उडाला म्हणून आंतरराष्ट्रीय भाषा आणि एरवी ‘मन की बात’ हे बरोबर नाही असा टोला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सामना संपादकीयच्या माध्यमातून लगावला आहे. वाचा सविस्तर..

५. इंधनाचे दर वाढण्यासाठी काँग्रेस आणि भाजपा दोघेही जबाबदार – मायावती

वाढत्या इंधन दरांसाठी काँग्रेस आणि भाजपा दोघेही समान जबाबदार असल्याची टीका बहुजन समाज पक्षाच्या सर्वेसर्वा मायावती यांनी केली आहे. काँग्रेसने सोमवारी पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या दराविरोधात ‘भारत बंद’ची हाक दिली होती. वाचा सविस्तर..