१३ दिवसांत दोन हजार ८६४ रुग्णांची नोंद

वसई : वसई-विरार शहरातील करोनाचा कहर दिवसेंदिवस वाढू लागला आहे. दिवसागणिक विविध ठिकाणच्या भागात रुग्ण वाढ होऊ लागली आहे. मागील १३ दिवसात सर्वाधिक रुग्ण हे विरार भागात आढळून आले आहेत. दोन हजार ८६४ रुग्णांची नोंद करण्यात आली आहे.

करोनाच्या दुसऱ्या लाटे दरम्यान रुग्णसंख्येत झपाटय़ाने वाढ होऊ लागली आहे. विरार, नालासोपारा, नायगाव, वसई या ठिकाणच्या भागातून रुग्ण सापडून आले आहेत.  आतापर्यंत  शहरातील रुग्णसंख्येने ६१ हजारांचा टप्पा पार केला आहे. तर बाराशेहून अधिक जणांचा बळी गेला आहे. सध्या स्थितीत शहरात दिवसाला सरासरी ६०० ते ७०० रुग्ण आढळून येत आहेत.

पहिल्या लाटेच्या दरम्यान नालासोपारा भागातून अधिक रुग्ण सापडून येत होते. मात्र दुसऱ्या लाटेदरम्यान हे चित्र बदलले आहे. १ ते १३ मे या दरम्यान वसईत ८ हजार १४७ नवीन करोना बाधीत रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. यातील  सर्वाधिक रुग्ण विरार भागातील आहेत. यात विरार पष्टिद्धr(१५५)म मध्ये १ हजार ५८५ तर पूर्वेतील भागात १हजार २७९ इतके रुग्ण आढळून आले आहे. विरार परिसरातही मोठय़ा संख्येने नागरिक राहत आहेत. त्यातच काही नागरिक विनाकारण घराबाहेर पडणे, रस्त्यावर बाजारात गर्दी करणे यामुळे शहरात करोनाचा फैलाव अधिक वेगाने होऊ लागल्याने रुग्ण संख्येत आणखीनचा वाढ होण्याची शक्यता वर्तविली जात आहेत. विरारच्या शहराच्या खालोखाल वसईतही पूर्व व पष्टिद्धr(१५५)म मिळून एकूण २ हजार ६२५, तर नालासोपारा २ हजार ३६२ , नायगाव २६० व इतर ३६ या प्रमाणे शहरात करोना बाधित रुग्णांची वाढ झाली आहे.