News Flash

महाराष्ट्र हे सर्वात जास्त करोना चाचण्या करणारं राज्य-राजेश टोपे

राजेश टोपे यांचा फेसबुकच्या माध्यमातून महाराष्ट्राशी संवाद

संग्रहित छायाचित्र

पॉझिटिव्ह रुग्ण हे महाराष्ट्रात आहेत कारण महाराष्ट्रात चाचण्या सर्वाधिक होत आहेत. ७० टक्के पॉझिटिव्ह रुग्ण यांची प्रकृती चांगली आहे. ५ टक्के रुग्णांची अवस्था ही थोडी चिंताजनक आहे. लॉकडाउन वाढवण्यात आला आहे याची माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केलं आहे. त्यामुळे येत्या काळात शिस्त पाळणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे नाहीतर हा कालावाधी आणखी वाढू शकतो असंही राजेश टोपे यांनी दिलं. महाराष्ट्रात रेड, ऑरेंज आणि ग्रीन असे झोन तयार केले जातील असेही संकेत राजेश टोपे यांनी दिले.

कोव्हिड केअर सेंटर यामध्ये ज्यांना लक्षणं दिसत नाहीत मात्र जे पॉझिटिव्ह आहेत असे रुग्ण असतील. दुसऱ्या प्रकारच्या रुग्णालयात ज्यांची प्रकृती चिंताजनक आहे त्यांना ठेवलं जाईल असंही म्हटलं आहे. तर लक्षणं नसणाऱ्या रुग्णांची सोय ही माईल्ड प्रकारच्या  रुग्णालयांमध्ये केली जाईल असंही त्यांनी स्पष्ट केलं. फेसबुक लाइव्हच्या माध्यमातून त्यांनी महाराष्ट्राशी संवाद साधला.

आज सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींची व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठक झाली. आरोग्य सेतू App हे सगळ्यांनी डाऊनलोड करावं अशी आग्रही भूमिका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बैठकीत घेतली असल्याचं राजेश टोपे यांनी सांगितलं. शेतीविषयक कामं आजही होऊ शकते. ग्रीन झोनसंदर्भातले निर्देश समोर आले तर लॉक इन मध्ये राहून काही भाग सुरु करता येतील का यावर विचार विनीमय सुरु आहे असंही राजेश टोपे यांनी सांगितलं.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 11, 2020 6:31 pm

Web Title: most of all tests in maharashtra says rajesh tope in press conference scj 81
टॅग : Coronavirus
Next Stories
1 “आयुष्यभर राजकारण सोडून दुसरं काय केलं? पण या गोष्टीत मला राजकारण नकोय”
2 …तर करोनाच्या संकटावर मात करुन भारत जगातील महासत्ता होईल: उद्धव ठाकरे
3 लॉकडाउन कधीपर्यंत वाढवायचा हे तुमच्या हातात, कारण… : उद्धव ठाकरे
Just Now!
X